पुण्यातील बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी झाली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 पुण्यातील बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी झाली

पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली

पुणे प्रतिनिधी - पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली.  बुधवार पेठेतील क

धुळ्यात बारा-बलुतेदार महासंघाची 20 मार्चला बैठक
कत्तलीसाठी नेताना दुभत्या गायींची गाडी पलटी
मुख्यमंत्रिपदाची हाव नसल्याचा मेसेज

पुणे प्रतिनिधी – पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली.  बुधवार पेठेतील क्रांती चौकात हा प्रकार घडला. या घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. मात्र, अजूनही पोलिसात घटनेची नोंद नाही. सीसीटीव्हीमध्ये काही आरोपी कोयत्याने वार करताना दिसत आहेत. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडला असल्याने एकच पळापळ झाली. दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने या बाबत चर्चा होत आहे.

COMMENTS