मोबाईलने घेतले दोन मुलींचे बळी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोबाईलने घेतले दोन मुलींचे बळी

नगर शहर व संगमनेर तालुक्यातील घटना

अहमदनगर/प्रतिनिधी : विज्ञान हे मानवजातीस शाप की वरदान हा प्रश्‍न वर्षानुवर्षे मानवाला पडला असला तरी सध्या मोबाईल शाप की वरदान असाच प्रश्‍न प्रमुख्यान

प्राचार्य डॉ.गावित यांनी मराठी संशोधन विभागाला उपक्रमशील गुणवत्ता दिली ः डॉ. बाबुराव उपाध्ये
आम्ही गणेश’च्या सभासदांना चांगला भाव देऊ
मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांचा विखेंच्या कार्यक्रमावर बहिष्कार

अहमदनगर/प्रतिनिधी : विज्ञान हे मानवजातीस शाप की वरदान हा प्रश्‍न वर्षानुवर्षे मानवाला पडला असला तरी सध्या मोबाईल शाप की वरदान असाच प्रश्‍न प्रमुख्याने समाजात दिसत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुण पिढी अधोगतीकडे जात असल्याचे नेहमीच बोलले जाते. या मोबाईल द्वारे होणार्‍या चांगले कामासोबत वाईट परिणामाची यादी काही कमी नाही. ऑनलाइन शिक्षणामुळे तर मोबाईल जीवनावश्यक बनला आहे. असे असले तरी मोबाईलचा अतिवापर घातक ठरत आहे याचेच उदाहरण म्हणजे नगर शहर व संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे झालेल्या अल्पवयीन मुलींच्या आत्महत्याची घटना घडल्या. सोशल मीडियाचा व्हाट्सअप वर चॅटिंग करताना बायको बायको म्हणून टाकलेल्या मेसेजमुळे झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना चित्तूर रोड वरील आशिष चेंबर्स बिल्डिंग येथे शुक्रवारी ( दि.15 ) घडली.
याबाबतची माहिती अशी की चितळे रोडवरील आशिष चेंबर येथे राहणारे शोभा शरद मुनगेल (वय 40) या बीडीचे पानाचे माप घेण्यासाठी तोफखान्यातील कारखान्यात गेल्या असता. त्यावेळी पती शरद यांनी फोन करून सांगीतले की, सिध्दी ही काहीएक बोलत नसुन तीचा आवाज येत नाही असे सांगुन तु लगेच घरी ये असे सांगीतल्याने त्या लगेच घरी गेल्या. त्यावेळी मुलगी सिध्दी ही बेशुद्ध अवस्थेत होती. पती शरद यांनी सांगीतले की, सिध्दी हीने घरात ओढणीने गळफास घेतला आहे त्यानंतर तीला म्ब्युलंसमध्ये स्वास्थ हॉस्पीटल अण्णाभाऊ साठे चौक, अ.नगर येथे नेले. तेथे नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तीला तपासुन मयत असल्याचे घोषीत केले. त्यानंतर तेथील खबरीवरून कोतवाली पोलिस स्टेशनला सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. सिद्धीचा मृतदेह पोस्टमार्टम करता सिव्हिल हॉस्पिटल येथे नेला असता,सिव्हील हॉस्पीटल येथील डेड बॉडी रुममध्ये एक तरुण नजर चुकवून मुलगी सिध्दी हिचे प्रेताजवळ जावुन तिच्याशी बोलत असल्याचे निदर्शनास आले तेव्हा त्यास विश्‍वासात घेवून विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव नाव इंद्रजित राजु माणकेश्‍वर ( वय 19 वर्षे रा. श्रीगणेश कॉलनी, माधवबाग, आलमगिर अहमदनगर ) असे असल्याचे सांगीतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल घेवून त्याने सिध्दीशी केलेली चॅटींग पाहिली असता त्यामध्ये वारंवार बायको बायको म्हणून मेसेज आहेत. त्यावरुन पोलिसांची खात्री झाली की, इंद्रजित याने मुलगी सिध्दी हीस बायको बायको म्हणुन मेसेज करुन तिला लग्न करण्याचा तगादा लावल्याने त्यास कंटाळुन मुलीने आत्महत्या केल्याचे खात्री झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यास घेवून कोतवाली पोलीस स्टेशनला आणून पुन्हा त्याचा मोबाईल चेक केला असता त्यात सिध्दी व इंद्रजित यांची मोठ्या प्रमाणावर चॅटींग झालेली आढळुन आली. तेव्हा पोलिसांची खात्री झाली की त्याचेच त्रासाला कंटाळुन सिद्धी हिने राहते घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सिध्दी शरद मुनगेल ( वय 16 ) हीने इंद्रजित राजु माणकेश्‍वर ( वय 19 वर्षे रा. श्रीगणेश कॉलनी, माधवबाग, आलमगिर अ.नगर ) याचे वारंवार व्हॉटसप चॅटींगदवारे बायको बायको असे म्हणुन लग्नाचा तगादा लावुन चॅटींग करुन तिला मानसिक त्रास देवुन तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिने राहते घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी शोभा मनुगेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कायदा कलम 305 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहे. दुसर्‍या घटनेमध्ये संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे मोबाईल रात्री अकरा वाजेपर्यंत वापरते या कारणावरून वडील रागावल्याने पंधरा वर्षीय मुलीने मुळा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दिनांक 14 घडली. घारगाव परिसरातील पंधरा वर्षे वयाची मुलगी गावातील शाळेत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होती. मुलगी सतत मोबाइल मध्ये व्यस्त राहत असल्यानेरात्री तिचे वडील तिच्यावर रागावले होते. याचा राग आल्याने रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेली होती. कुटूंबियासह नातेवाईकांनी रात्रभर या मुलीचा शोध घेतला मात्र ती कोठेही आढळून आली नाही. दरम्यान,गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुळा नदीपात्रामध्ये पुलाखाली तिचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी घारगाव पोलिसांनी भेट देत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरमध्ये आणला. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात सी आर पी सी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलिस नाईक राजेंद्र लांघे करीत आहे.

COMMENTS