Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर-मनमाड रोडवरील अपघातात दोघांचा मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर-मनमाड महामार्गावरील हॉटेल मेजवानीसमोर मालट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या अपघातात लोणी खुर्द येथील

समृद्धी महामार्गावरील अपघातात दोघे जखमी
विक्रोळीतील अपघातात दोघांचा मृत्यू
अपघातात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर-मनमाड महामार्गावरील हॉटेल मेजवानीसमोर मालट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या अपघातात लोणी खुर्द येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संतोष नाना पारखे (वय 39) व सचिन आबासाहेब खराड (वय 37) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. दुचाकी (क्रमांक – एम. एच. 17 बीपी 8750) व मालवाहतूक ट्रक (क्रमांक – टी एन 52 एफ 2520) यांची समोरासमोर धडक झाली. या घटनेची खबर लोणी पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतांना शवविच्छेदनासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताच्या घटनेने लोणी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. लोणी पोलीस ठाण्यात या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे करीत आहेत.

COMMENTS