मुंबई : मालाड मालवणी येथे एका सार्वजनिक शौचालयाच्या गटारात तीन तरुण पडल्याची घटना घडली. मालवणी गेट क्रमांक 8 येथे घडलेल्या या घटनेतील तिघांना बाह

मुंबई : मालाड मालवणी येथे एका सार्वजनिक शौचालयाच्या गटारात तीन तरुण पडल्याची घटना घडली. मालवणी गेट क्रमांक 8 येथे घडलेल्या या घटनेतील तिघांना बाहेर कढण्यात यश आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यापैकी दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या तीन तरुणांना परिसरातील नागरिकांनी बाहेर काढले व पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. तिघांपैकी सुरज केवत (18) आणि बिकास केवत (20) या दोघांचा मृत्यू झाला. तर रामलगन केवत (45) यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
COMMENTS