कल्याण प्रतिनिधी - डोंबिवली एमआयडीसी भागातील दोन कंपन्यांना आग लागल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आगीने काही क्षणात रौद्र रूप धा

कल्याण प्रतिनिधी – डोंबिवली एमआयडीसी भागातील दोन कंपन्यांना आग लागल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केल्याने दोन्ही कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राज टेक्सटाइल व रॅमसन्स अशी दोन कंपन्यांची नावे आहेत. या दोन्ही कंपन्यांमधील कर्मचारी संध्याकाळी कंपनी बंद करून घरी निघून गेल्याने सुदैवाने कंपनीत कोणी नव्हतं त्यामुळे जीवितहानी टळली. साडे चार वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागला यश आले असून अधून मधून आगेचे स्फोट सुरू असून सध्या अग्निशामक दलाने कुलिंगचे काम सुरू केले आहे.
COMMENTS