दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्याने परिसरात खळबळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्याने परिसरात खळबळ

हडपसर मधील धक्कादायक घटना

पुणे प्रतिनिधी - पुणे जिल्ह्यातील शेवाळवाडी, हडपसर येथे दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक

निवडणुकीसाठी 5 लाख रुपये माहेरकडून आणण्यासाठी छळ.
भाईंदर रेल्वे स्थानकात बाप-लेकाची आत्महत्या
जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे प्रतिनिधी – पुणे जिल्ह्यातील शेवाळवाडी, हडपसर येथे दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकाने गळफास लावून घेतला आणि रुग्णालयातून नेत असताना दुसऱ्याने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सानिका हरिश्चंद्र भागवत (वय- 19 ) आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय- 19) अशी आत्महत्या केलेल्या दोन मैत्रिणींची नावं आहे. शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ क्रिस्टल सोसायटी या इमारतीत सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सात वाजण्याच्या सुमारास सानिका हिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सानिकाचा मृतदेह रुग्णावाहिकेमधून घेऊन जात असताना तिची मैत्रीण आकांक्षाने पहिले. आपल्या मैत्रिणीने आत्महत्या केल्याचा तिला जबर धक्का बसला. त्यानंतर आकांक्षाने त्याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.

COMMENTS