Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आगीमध्ये दोन दुचाकी व संसारपयोगी साहित्य जळून खाक

चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक बाईकने शेजारील पेट्रोल गाडीलाही केले लक्ष्य

Oplus_0 राहाता ः चार्जिंगला लावलेली इलेक्ट्रिक दुचाकी व एक पेट्रोल दुचाकी सह काही संसार उपयोगी साहित्य आगीमध्ये जळून खाक झाल्याची घटना राहाता शहरा

कोपरगावात डॉ. आंबेडकरांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीस प्रतिबंधसाठी तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना
कत्तलीसाठी आणलेल्या सहा गोवंश जनावरांची सुटका
Oplus_0

राहाता ः चार्जिंगला लावलेली इलेक्ट्रिक दुचाकी व एक पेट्रोल दुचाकी सह काही संसार उपयोगी साहित्य आगीमध्ये जळून खाक झाल्याची घटना राहाता शहरात घडली आहे. या आगीमध्ये दोन दुचाकीसह इतर साहित्य मिळून सुमारे दोन लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने स्थानिक नागरिक व अग्निशमन पथक वेळीच दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
राहाता शहरातील शनी मंदिर चौका जवळ राहणारे समीर खाटीक यांच्या घरी 15 जून रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही जळीताची घटना घडली. याबाबतची समजलेले वृत्त असे की रात्री दुकान बंद करून घरी गेल्यानंतर समीर खाटीक यांनी आपल्या पडवी मध्ये इलेक्ट्रिक बाइक अर्थात दुचाकी चार्जिंग साठी लावली होती. तिच्याजवळ दुसरी पेट्रोल वर चालणारी दुचाकी होती. रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास अचानक धूर व जाळ दिसल्यानंतर खाटीक कुटुंब बाहेर येईपर्यंत आसपासच्या स्थानिक नागरिकांनी हाताने बादलीच्या साह्याने पाणी फेकून आग विझवण्याचा प्रयत्न करीत असतानाच राहाता नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा व पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले अग्निशामन विभागप्रमुख अशोक साठे प्रकाश धावडे ऋषिकेश सदाफळ शादाब शेख लखन गोयर तसेच कर्मचारी यांनी नागरिकांच्या साह्याने आग आटोक्यात आणली आणि सर्वांनी सुटकेचा निश्‍वास सोडला ज्या ठिकाणी आग लागली होती तिथे दाट लोकवस्ती आहे. वेळीच आग विझवली नसते तर मोठा अनर्थ घडला असता ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे बोलले जात आहे. या आगीमध्ये मात्र या गरीब व्यावसायिकाचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

COMMENTS