आज देशातील १०२ लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून, एकूण २१ राज्यांमध्ये हे मतदान होत आहे. यामध्ये, अरुणाचल प्रदेशच्या २, आसाम ५, बिहार ४, छत्तीसगड
आज देशातील १०२ लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून, एकूण २१ राज्यांमध्ये हे मतदान होत आहे. यामध्ये, अरुणाचल प्रदेशच्या २, आसाम ५, बिहार ४, छत्तीसगड १, मध्य प्रदेश ६, महाराष्ट्र ५, मणिपूर २, मेघालय २, मिझोरम १, नागालँड १, राजस्थान १२, सिक्कीम १, त्रिपुरा १, उत्तर प्रदेश ८, उत्तराखंड ५, पश्चिम बंगाल ३, अंदमान-निकोबार १, जम्मू-काश्मीर १, लक्षद्वीप १, पुद्देचेरी १ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तामिळनाडू या राज्यामधील ३९ असणाऱ्या या सर्व जागांवर आज मतदान होत आहे. मतदानाच्या ७ फेऱ्या लोकसभा निवडणुकीत होत असून, त्याची पहिली फेरी ही आज होत आहे. सर्वाधिक जागा देखील या पहिल्या फेरीतच आहेत. महाराष्ट्राच्या नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि रामटेक या पाच मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. सबंध भारतामध्ये एकमेव तमिळनाडू हे राज्य आहे की, जिथे एकाच फेजमध्ये आणि त्याही पहिल्याच फेजमध्ये सर्व जागांवर निवडणूक होत आहेत. याचाच अर्थ सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला तामिळनाडूमध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नाही, हे जवळपास त्यांच्या मनात निश्चित आहे! कारण, ७ फेऱ्यांमधील मतदानामध्ये केवळ निवडणूक आयोगाचे हे नियोजन नसून, सत्ताधारी पक्षाचा यामध्ये निश्चितपणे मार्गदर्शक हात असावा, अशी विरोधकांना शंका राहिलेली आहे. प्रत्येक राज्यामध्ये किमान तीन ते चार फेऱ्या होत असताना, तमिळनाडू याला अपवाद का राहिलं, हा मात्र अतिशय गमतीचा असा प्रश्न आहे! महाराष्ट्रातल्या पाचही जागांवर अटीतटीच्या लढती होतील.
यामध्ये नागपूर मध्ये वर्तमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकूर यांची जोरदार लढत होत आहे. खास करून या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य असं की, गडकरी हे गोवा अधिवेशनामध्ये अध्यक्ष पदी निवडून येऊ शकले नाही, त्याचं कारण त्यांच्या पूर्ती कंपनीचा घोटाळा एका पत्रकाराने बाहेर काढला होता. सध्या योगायोगाचा भाग असा की, त्याच पत्रकाराने आपल्या नोकरीला राजीनामा देऊन या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकूर यांच्या प्रचाराच्या नियोजनाची भूमिका निभवली. त्यामुळे या लढतीमध्ये तुल्यबळ अशी लढत होण्याची संकेत आहेत. त्यामध्ये अंडर करंट असणारे घटक अशा पद्धतीने काम करत आहेत. भंडारा-गोंदिया हा मतदारसंघ यामध्ये ओबीसीचे एक स्ट्रॉंग उमेदवार प्रदीप ढोबळे हे निवडणूक लढत आहेत. जवळपास पाच पक्षांनी त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. अर्थात, प्रदीप ढोबळे हे उच्चशिक्षित आणि ओबीसी समाजातील खऱ्या अर्थाने विचारांचे प्रबोधन करणारे ते नेते आहेत, परंतु, या मतदारसंघातील जी लढत आहे; ती खासकरून काँग्रेस आणि भाजप यांच्यातच प्रामुख्याने दिसते आहे. रामटेक मध्ये पूर्व सनदी अधिकारी किशोर गजभिये हे वंचित बहुजन आघाडी कडून तुल्यबळ लढत देतील. मात्र, एक निश्चित पाहावं लागेल की, त्यांची लढत नेमकी कोणत्या पक्षाबरोबर राहणार आहे! कारण, भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे उमेदवार या मतदारसंघात देखील आहेत. किशोर गजभिये यांनी यापूर्वी काँग्रेसची उमेदवारी करत दुसऱ्या क्रमांकावर ते या मतदारसंघांमध्ये होते.
देशातील ५४३ जागांसाठी सात फेऱ्यात जे मतदान होईल, त्यामध्ये जवळपास देशात ९६ कोटी पेक्षा अधिक मतदार आहेत. यामध्ये महिला आणि पुरुष मतदारांची संख्या जवळ जवळ सारख्या प्रमाणात आहे. त्यातील १०२ जागांवर जवळपास २०% पेक्षा आज या जागा आहेत आणि या २० ते २१ टक्के असणाऱ्या जागांवर जे मतदान होत आहे. त्यामध्ये निश्चितपणे वीस कोटींपेक्षा अधिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. साधारणतः उत्तर प्रदेशामधील देखील आठ जागांपैकी २०१९ च्या निवडणुकीत भाजपला किमान पाच जागा होत्या. परंतु, या निवडणुकीत त्या आठ जागांपैकी भारतीय जनता पक्ष किती जागा राखते, हे महत्त्वाचे आहे. साधारणतः पहिल्या फेरीचे जे मतदान आहे ते देशातल्या २१ राज्यांमध्ये होत असल्यामुळे या मतदारांमध्ये बहुविधता आहे. परंतु, विचारांच्या दृष्टीने भाजपच्या सत्ताविषयी त्यांची नेमकी मानसिकता काय आहे, ही या निवडणुकीत प्रामुख्याने उमटणार आहे. म्हणून आजचं हे मतदान गेल्या दहा वर्षाच्या सत्तेच्या अँटी इन्कमबन्सीवर शिक्का मोर्तब करते का, हे मात्र आपल्याला ४ जूनला समजून घ्यावे लागेल!
COMMENTS