Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परळी वैजनाथमध्ये आंबेडकर जयंती समितीत खळबळ; सचिव राम अदोडे यांचा अचानक राजीनामा

परळी वै. : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सचिव राम बाबासाहेब अदोडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे

दहिफळमध्ये नेतृत्वाची नवी दिशा; जबाबदारी आणि अपेक्षांची दुहेरी कसोटी
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खासबाग जयंती उत्सव समितीची कार्यकारणी जाहीरअध्यक्षपदी आतिष वडमारे; सचिवपदी प्रतिक भोले, उपाध्यक्षपदी विशाल वडमारे यांची निवड
लिंबागणेशमध्ये शेतकरी सहवेदना दिवस पाळला; आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना श्रद्धांजली

परळी वै. : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सचिव राम बाबासाहेब अदोडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे.
भीमनगर येथील रहिवासी असलेल्या अदोडे यांची दिनांक 9 मार्च 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या समाजाच्या बैठकीत सर्वानुमते सचिवपदी निवड करण्यात आली होती. मात्र, निवडीनंतर समितीच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी पदाचा राजीनामा जाहीर केला. अदोडे यांनी आरोप केला की, समितीचे अध्यक्ष आणि त्यांच्या काही सहकार्‍यांकडून तसेच राजकीय पाठबळ असलेल्या काही नेत्यांच्या प्रभावामुळे जयंती उत्सवाच्या नियोजनात त्यांना योग्य स्थान दिले जात नव्हते. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने काम करणे कठीण झाले, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती भव्य आणि उत्कृष्ट पद्धतीने साजरी व्हावी, या उद्देशाने मी कोणत्याही स्वार्थाशिवाय जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, समितीत निर्माण झालेल्या वातावरणामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, असे अदोडे यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यामुळे जयंती उत्सव समितीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील कार्यपद्धती आणि नियोजनाबाबत समाजात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

COMMENTS