Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री क्षेत्र पिंपळनेर येथे तुकाराम बीज उत्साहात 

श्री क्षेत्र पिंपळनेर येथे तुकाराम बीज उत्साहात  निघोज : पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे श्री संत निळोबाराय मंदिरात तुकाराम बीज उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी हभप माऊली खामकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कीर्तनामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भक्तीभाव, वैकुंठ गमन आणि वारकरी संप्रदायातील त्यांच्या कार्याचा भावपूर्ण उहापोह खामकर महाराज यांनी केला. त्यांच्या प्रभावी कीर्तन सेवेमुळे उपस्थित वारकरी आणि भाविक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमात श्री संत निळोबाराय महिला भजनी मंडळाने साथ दिली. तर मृदुंगसाथ संत निळोबाराय वारकरी शिक्षण संस्थेतील वर्षा जाधव व राधिका क्षिरसागर यांनी दिली. कीर्तनानंतर भास्कर केशव गाजरे गुरुजी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत निळोबाराय देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत, निळोबाराय वंशज गोपाळ बुवा मकाशीर, भाऊसाहेब लटांबळे, संपत सावंत, बाळासो सावंत, विजुशेठ गुगळे, रामदास बुवा रास्कर, वसंत गाजरे, राजू शिर्के, विठ्ठल गाजरे, मच्छिंद्र गाजरे, अनिल पोटे, आबासाहेब साबळे आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगरमध्ये लंके यांचाच डंका
आपण पवार कुटुंबियासोबतच राहणार
नीलेश लंकेंनी जम्मूमध्येही जपली सामाजिक बांधिलकी !

श्री क्षेत्र पिंपळनेर येथे तुकाराम बीज उत्साहात 

निघोज : पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे श्री संत निळोबाराय मंदिरात तुकाराम बीज उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी हभप माऊली खामकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कीर्तनामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भक्तीभाव, वैकुंठ गमन आणि वारकरी संप्रदायातील त्यांच्या कार्याचा भावपूर्ण उहापोह खामकर महाराज यांनी केला. त्यांच्या प्रभावी कीर्तन सेवेमुळे उपस्थित वारकरी आणि भाविक मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमात श्री संत निळोबाराय महिला भजनी मंडळाने साथ दिली. तर मृदुंगसाथ संत निळोबाराय वारकरी शिक्षण संस्थेतील वर्षा जाधव व राधिका क्षिरसागर यांनी दिली. कीर्तनानंतर भास्कर केशव गाजरे गुरुजी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत निळोबाराय देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत, निळोबाराय वंशज गोपाळ बुवा मकाशीर, भाऊसाहेब लटांबळे, संपत सावंत, बाळासो सावंत, विजुशेठ गुगळे, रामदास बुवा रास्कर, वसंत गाजरे, राजू शिर्के, विठ्ठल गाजरे, मच्छिंद्र गाजरे, अनिल पोटे, आबासाहेब साबळे आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS