Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंगलेल्या काळाचे तुकडे सांधण्याचा प्रयत्न म्हणजे कोलाज संभ्रमाचे वर्तमान

ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे ः अशोक लिंबेकर लिखित कोलाज : संभ्रमाचे वर्तमान या कादंबरीचे प्रकाशन

संगमनेर/प्रतिनिधी ः आजचे वास्तव हे दुभंगलेले नसून भंगलेले आहे. त्याचे अनेक तुकडे झालेले असून विस्कळीत आणि भंगलेल्या काळाचे तुकडे सांधण्याचा प्रयत

शनेश्वर प्रतिष्ठानाच्या वतीने ; रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू
दीक्षा सोनवणेची अजिंक्य पद कुस्ती स्पर्धेसाठी निवड
संगमनेरमध्ये जागतिक ग्राहक दिन उत्साहात

संगमनेर/प्रतिनिधी ः आजचे वास्तव हे दुभंगलेले नसून भंगलेले आहे. त्याचे अनेक तुकडे झालेले असून विस्कळीत आणि भंगलेल्या काळाचे तुकडे सांधण्याचा प्रयत्न करणे हे या कादंबरीचे विधान आहे. कादंबरीकाराला  प्रश्‍न पडणे महत्त्वाचे आहे. आपल्या भोवतालच्या वर्तमानाचा अर्थ न लागणे, नीट न समजणे, यातून अतिरेकी संताप होऊन त्या संतापातून वाट काढत आपण स्वतःशी बोलणे. आपल्या मनातील प्रश्‍नांचे खांब घेऊन त्यावर वास्तू तयार करणे आणि त्या वास्तुत आपल्या प्रश्‍नांचे उत्तर शोधणे म्हणजे वास्तुशिल्प तयार करणे होय. अशा प्रकारचे वास्तुशिल्प कोलाज या कादंबरीतून लिंबेकर यांनी तयार केल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले.
 ते अशोक लिंबेकर लिखित कोलाज : संभ्रमाचे वर्तमान या कादंबरीच्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शब्दालयच्या प्रकाशक सुमती लांडे, ज्येष्ठ चित्रकार धनंजय गोवर्धने संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड आणि लेखक  अशोक लिंबेकर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पठारे म्हणाले की,  आपल्या सभोवतालच्या वर्तमानाला समजावून घेऊन त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न या कादंबरीतून झाला आहे. प्रेमभावना ही चिरंतन भावना आहे. आजच्या काळात प्रेम हे विकृतीकडे वळत असताना कादंबरीतील प्रेमाचे सुंदर चित्रण त्यासोबत अनेक प्रकारची शब्दशिल्प तयार करणं हे खूप आश्‍वासक आणि सुंदर आहे. आजचं वर्तमान उद्या बदलतं. नित्य असं हातात धरून ठेवावं असं नाही. हा सगळा संभ्रमित करणारा काळ आणि बदल त्याचे अनेक रूप चित्रित करणे हा लेखकाचा धर्म  या कादंबरीतून पाळला आहे. या कादंबरीच्या मुखपृष्ठाविषयी ज्येष्ठ चित्रकार धनंजय गोवर्धने म्हणाले की, चित्रकाराचं व्यक्त होणं म्हणजे कादंबरीचा आशय लक्षात घेऊन त्याचा अर्थ चित्र स्वरूपात साकार करणं होय. याप्रसंगी कादंबरीवर आधारित संवादसत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. राजेंद्र सलालकर, डॉ. आनंद कुलकर्णी प्रा. सुशील धसकटे व डॉ. दत्तात्रय गंधारे या समीक्षकांनी कोलाज या कादंबरीतील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.या कार्यक्रमाचे आभार डॉ. राहुल लांडे यांनी मांनले तर सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले.  प्रकाशन कार्यक्रमासाठी संगमनेरातील अनेक रसिक वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS