Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हरभरा उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा : भोरे

लोणी : शेतकऱ्यांनी हरभरा पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान समजून घेत लागवड करण्याची गरज आहे.  यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सल्ला आणि सु

श्रीमान गोकुळचंजी विद्यालयामध्ये माजी विद्यार्थीचा मेळावा उत्साहात
अहमदनगर : श्री विशाल गणेशाच्या चरणी सोन्याचा मोदक अर्पण
कोल्हे साखर कारखान्यातील इथेनॉलचा ऑईल कंपन्यांना पुरवठा

लोणी : शेतकऱ्यांनी हरभरा पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान समजून घेत लागवड करण्याची गरज आहे.  यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सल्ला आणि सुविधांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी कडधान्याची उत्पादकता  वाढवावी असे प्रतिपादन राहत्याचे तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी केले.

  पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त सिंधुताई शेतकरी महिला प्रोडूसर कंपनी, लोणी आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय राहता यांच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य उत्पादन वाढ कार्यक्रमांतर्गत राहता तालुक्यातील  गोगलगाव, आडगाव आदी भागातील शेतकऱ्यांना हरभरा बियाणे आणि मिनी किडचे वितरण लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडल कृषी अधिकारी रमेश चोपडे, कृषी सहाय्यक संध्या महागडे, ऋतिका शहाणे, प्रियांका दिघे आदींसह शेतकरी उपस्थित होते. यावेळी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद  साधत बियाणाची चांगली लागवड करा आणि या बियाणाच्या माध्यमातून आपले उत्पादन वाढवा असे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS