वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की ते या महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेत होणार्या जी-20 परिषदेत सहभागी ह

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की ते या महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेत होणार्या जी-20 परिषदेत सहभागी होणार नाहीत. ट्रम्प यांनी सांगितले कि, मी दक्षिण आफ्रिकेत माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणार नाही. त्या देशाला जी-20 मध्ये असण्याचा हक्क नाही.
मियामी येथे झालेल्या अमेरिका बिझनेस फोरम दरम्यान ट्रम्प म्हणाले, दक्षिण आफ्रिकेत जी-20 ची बैठक आहे. मी तिथे जाणार नाही. दक्षिण आफ्रिकेला आता जी-20 मध्ये असायलाच नको, कारण तिथे जे घडले ते अत्यंत वाईट आहे. मी त्यांना सांगितले आहे, की मी जाणार नाही. मी तिथे माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणार नाही. त्या देशाला जी-20 मध्ये असण्याचा हक्क नाही. दक्षिण आफ्रिकेने 1 डिसेंबर 2024 रोजी एका वर्षासाठी जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारले होते आणि 22 ते 23 नोव्हेंबरदरम्यान जोहान्सबर्ग येथे या समूहाच्या नेत्यांच्या परिषदेला यजमानत्व देणार आहे. हा पहिलाच प्रसंग असेल की जी-20 शिखर परिषद आफ्रिकन खंडावर होणार आहे.

COMMENTS