Homeताज्या बातम्याविदेश

फ्रान्सवर 200 टक्के आयातकर लादण्याचा ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फ्रान्स यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. ट्रम्प यांच्या प्रस्तावित आंतरराष्ट्री

व्हेनेझुएलावर हल्ला आणि ट्रम्प यांचा दुटप्पीपणा !
इराणमधील अशांतता आणि अस्थिरता !
अन्यथा,…केवळ राख आणि विनाश उरेल!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फ्रान्स यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. ट्रम्प यांच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय ‘पीस बोर्ड’मध्ये सहभागी होण्यास फ्रान्सने नकार दिल्यानंतर, फ्रेंच वाईन आणि शँपेनवर तब्बल 200 टक्के आयातकर लावण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.
हा ‘पीस बोर्ड’ सुरुवातीला गाझा युद्धग्रस्त भागाच्या पुनर्बांधणीसाठी स्थापन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या मंचाचा व्याप केवळ गाझापुरता मर्यादित नसून, जागतिक शांततेसाठी व्यापक व्यासपीठ उभे करण्याचा ट्रम्प यांचा दावा आहे. फ्रान्सने या उपक्रमात सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतरच ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा समोर आला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी थेट शब्दांत इशारा दिला. फ्रान्सने विरोध कायम ठेवला, तर त्यांच्या वाईन आणि शँपेनवर 200 टक्के टॅरिफ लावला जाईल. बोर्डमध्ये येणे त्यांच्यावर बंधनकारक नाही, पण परिणाम भोगावे लागतील, असे ट्रम्प म्हणाले. या विधानातून फ्रान्सवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे. या वादाला आणखी धार देत ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया मंचावर फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांचा एक खासगी संदेश सार्वजनिक केला. या संदेशात इराण आणि सिरियासंदर्भात दोन्ही देशांमध्ये साम्य असल्याचे मॅक्राँ यांनी नमूद केले आहे. मात्र, ग्रीनलँडच्या मुद्द्यावर ट्रम्प यांची भूमिका समजत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मॅक्राँ यांनी या संदेशात ट्रम्प यांना दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात भेटण्याचे आमंत्रण दिले होते. गुरुवारी डिनरवर चर्चा घडवून आणण्याचा प्रस्ताव देत, इतर जी-7 देशांचे नेते तसेच युक्रेन, डेन्मार्क, सिरिया आणि रशियाचे प्रतिनिधी यांनाही चर्चेत सहभागी करता येईल, असे त्यांनी सुचवले होते. दरम्यान, खासगी संवाद सार्वजनिक केल्यामुळे ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे. फ्रान्स आणि अमेरिका यांच्यातील हा वाढता तणाव व्यापारयुद्ध आणि आंतरराष्ट्रीय राजनैतिक संबंधांवर काय परिणाम करतो, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.
 

COMMENTS