शाळेतून विद्यार्थ्यांचा खरा व्यक्तिमत्व विकास : ना.आशुतोष काळे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळेतून विद्यार्थ्यांचा खरा व्यक्तिमत्व विकास : ना.आशुतोष काळे

कोपरगाव/प्रतिनिधी : मागील दोन ते अडीच वर्षापासून जीवघेण्या कोरोना महामारीमुळे शाळा बंद ठेवावी लागली होती. विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाऊ नये यासाठी

आत्मकेंद्री लोकशाहीमुळे अनागोंदी व भ्रष्टाचार पोसला गेल्याचा आरोप
मोबाईलवर बोलताना हटकले, पतीला चक्क बॅटने बदडले…
गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला सुटणार उन्हाळी आवर्तन

कोपरगाव/प्रतिनिधी : मागील दोन ते अडीच वर्षापासून जीवघेण्या कोरोना महामारीमुळे शाळा बंद ठेवावी लागली होती. विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले परंतु ऑनलाईन शिक्षण हि तात्पुरती पर्यायी व्यवस्था होती. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेत मिळणारे शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असून शाळेतूनच विद्यार्थ्यांचा खरा व्यक्तिमत्व विकास होतो असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव कोळपेवाडी येथील श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2022/23 च्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी श्री.साईबाबा संस्थानच्या विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शालेय शिक्षणात विदयार्थी रमतो, त्याला नवनवीन मित्र भेटतात. विचारांची देवाण घेवाण होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या मनातील भीती आणि चिंता सहजपणे दूर होतात. शाळेतून मिळणार्‍या शिस्तीच्या धड्यातून आयुष्यात मोठा फायदा होतो. शरीर तंदुरस्त राहून शारीरिक झीज भरून येण्यासाठी शाळेतील मैदानी खेळ उपयोगी पडतात. विदयार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता व गुणवत्ता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करूण या देशाची जबाबदार पिढी घडवू शकतात. त्यामुळे विद्यार्थी दशेत शाळेचे अनन्यसाधारण महत्व असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, स्थानिक स्कुल कमिटी सदस्य वसंतराव कोळपे, ज्ञानेश्‍वर हाळनोर, भाऊसाहेब ढोमसे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सतीश नरोडे, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

आशुतोष काळे रमले विद्यार्थ्यांमध्ये
रयत शिक्षण संस्था आणि काळे परिवार यांचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या मुलांना शिक्षणाची सोय निर्माण व्हावी या दूरदृष्टीतून कर्मवीर शंकररावजी काळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाळा महाविद्यालयांचे जाळे विणले. हि शाळा, महाविद्यालय काळे परिवाराने जपली आणि वाढवली देखील.ज्या ज्या वेळी कोणत्याही रयत संकुलात कर्मवीर शंकररावजी काळे कार्यक्रमानिमित्त जात असत त्या त्या वेळी ते विद्यार्थ्यांमध्ये रमलेले त्यांच्या सोबत सामाजिक काम केलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी अनुभवले आहे. आजही ना. आशुतोष काळे आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून चिमुकल्यांच्या स्वागताला हजर राहून त्यांच्यामध्ये रमून गेल्याचे पाहिल्यावर कर्मवीर शंकररावजी काळे यांची आठवण झाली.

COMMENTS