Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागर जोगवा कार्यक्रमातून आदिशक्‍तीला वंदन

चांदवडच्‍या रेणुकादेवी मंदिरातील कार्यक्रमात ३१ भजनी मंडळाचे सादरीकरण

नाशिक- सुरेल, सुमधुर आवाजातील भजनांतून, टाळ-मृंदुंगांचा गजर करतांना अन्‌ टाळ्यांच्‍या स्‍वरुपातील प्रतिसादातून आदिशक्‍तीला वंदन करण्यात आले. औचि

Ahmednagar : अरणगाव येथे विवाहित महिलेची आत्महत्या… पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
प्रथमच वंचित बहुजन आघाडीचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक रिंगणात उमेदवार….
माजी नगरसेवक शिवद्रोही छिंदमकडून एकास जातीवाचक शिवीगाळ

नाशिक- सुरेल, सुमधुर आवाजातील भजनांतून, टाळ-मृंदुंगांचा गजर करतांना अन्‌ टाळ्यांच्‍या स्‍वरुपातील प्रतिसादातून आदिशक्‍तीला वंदन करण्यात आले. औचित्‍य होते कोजागिरी पौर्णिमानिमित्त चांदवडच्‍या रेणुका माता मंदिर परिसरात आयोजित जागर जोगवा या कार्यक्रमाचे.  स्‍व. चतुर्भुज बजरंगलाल चौधरी प्रतिष्ठान महिला मंडळातर्फे आयोजित केलेल्‍या या कार्यक्रमात ३१ महिला भजनी मंडळांनी सहभागी होतांना भक्‍तीभावाने देवीची आराधना केली.

चांदवड येथील श्री रेणुका देवी संस्‍थान आणि नाशिकचे चौधरी यात्रा कंपनी प्रा. लि., नाशिकचे सोनी पैठणी, अशोका ग्रूप, माजी सभागृह नेता दिनकर आण्णा पाटील, उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष नाना सानप, संजय वाणी, रिलायन्स ज्वेलर्स यांची कार्यक्रमासाठी मोलाची साथ लाभली.  शनिवारी (२८ ऑक्‍टोबर) दुपारी १ पासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली.  दीपप्रज्‍वलनाप्रसंगी नानासाहेब सानप, सुभाष पवार, लता दिनकर पाटील, मनिषा सानप, जितेंद्र येवले, योगेश कासार, मंडालेश्वर काळे, तृप्तीदा काटकर, पद्मीनी काळे, संगिता वेढणे, वनिता कासार, दिप्ती येवले यांची उपस्‍थिती लाभली. यावेळी गुरुजनांचा सत्‍कारदेखील पार पडला. यामध्ये शिला पंडित, नंदा शेठे, मनिषा जोशी, सुनिता तळवेलकर, प्रज्ञा मेतकर, उज्‍ज्‍वला वाणी, रोहिणी जोशी यांचा सत्‍कार करण्यात आला.

३१ भजनी मंडळातील ८०० हून अधिक महिला भाविकांनी यावेळी भक्‍तीगीत, भजन, गवळण, जोगवा सादर करतांना उपस्‍थित भाविकांना मंत्रमुग्‍ध केले. प्रत्‍येक सादरीकरणाला टाळ्यांच्‍या स्‍वरुपात प्रतिसाद मिळत होता. यातून परिसरातील वातावरण भक्‍तीमय बनले होते. स्‍वागत व प्रास्‍ताविक करतांना उपक्रमाचे समन्‍वयक जितेंद्र येवले यांनी या कार्यक्रम आयोजनाची भूमिका स्‍पष्ट केली. व भजनी मंडळांनी दिलेल्‍या प्रतिसादाबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र येवले व विजयालक्ष्मी गुजर यांनी केले.तृप्तीदा काटकर यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. योगेश कासार यांनी आभार मानले. उत्सव समितीतील सर्व महीला सदस्यांनी परीश्रम घेतले.

पालखी सोहळा, महाआरतीमध्ये सहभाग– या कार्यक्रमानिमित्त पारंपारीक पद्धतीने ध्वजारोहण व ढोल ताशांसह टाळ, मृदुंगाच्‍या गजरात श्री रेणुकादेवी पालखी सोहळा मंत्रमुग्‍ध करणारा ठरला. तसेच एकाचवेळी 801 महिलांचा महाआरती सोहळा आणि ५०१ पणत्‍यांचा दिपोत्‍सव लक्षवेधी ठरला होता. भजन स्‍पर्धेत व उपक्रमात सहभागी महिलांसाठी नाशिक ते चांदवड व  पुन्‍हा नाशिकला परतीच्‍या प्रवासासाठी लक्‍झरी बसची सुविधा केली होती. तसेच महाप्रसादाचेही आयोजन केले होते.

COMMENTS