Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी समाजाने आपले हक्क जाणून घ्यावे

अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांचे आवाहन

पाथर्डी ः आदिवासी समाजाने स्वातंत्र्यलढ्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले मात्र आजही स्वातंत्र्यानंतर या समाजाची अवस्था अतिशय भीषण आहे. नैसर्गिक जी

महिलेच्या घरात अनाधिकाराने घुसून दमदाटी, गुन्हा दाखल
तीन कोटींच्या विम्याची हाव, महिलेने पतीला कारमध्ये जिवंत जाळलं! पहा सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24
माजी आमदार मुरकुटे यांना जामीन मंजूर

पाथर्डी ः आदिवासी समाजाने स्वातंत्र्यलढ्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले मात्र आजही स्वातंत्र्यानंतर या समाजाची अवस्था अतिशय भीषण आहे. नैसर्गिक जीवन व संस्कृती आदिवासी समाजाने जोपासली शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी समाज पुढे जाऊ शकत होता, मात्र मध्यंतरीच्या काळात समाजाच्या न्याय हक्कासाठी बिरसा मुंडा नंतर या समाजाला उचित हक्क मिळालेला नाही. त्यामुळे आदिवासी समाजातील नवीन पिढीने शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या अधिकार व हक्क काय आहेत याचा अभ्यास करावा योजनांची माहिती घ्यावी त्यातून समाजाची प्रगती होऊ शकते असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी केले. ते प्रतापराव ढाकणे मित्र मंडळ व आदिवासी जनांदोलन समिती च्या वतीने आज संस्कार भवन येथे झालेल्या शेवगाव पाथर्डी तालुक्यातील आदिवासी मेळाव्याचे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे, माजी संचालक वैभव दहिफळे, साहेबराव पवार, चंदन पवार, सुनीता पवार, बबनराव आहेर अण्णासाहेब पवार, कैलास माळी, देवा पवार, छबुराव निकम, डॉक्टर राजेंद्र खेडकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ढाकणे यांनी म्हटले की, आदिवासी समाज हा मानव जातीचा उत्पत्तीचा मुळा असून आज 78 वर्षानंतरही आदिवासी समाजाची अवस्था मन हेलावून टाकणारी आहे पुरातन काळात द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापून घेतला आजचे सत्ताधारी द्रोणाचार्यांनी आदिवासींचे जमिनीवरील हक्क हिसकावून घेत आहेत. राज्यात पारधी विकास मंडळाच्या माध्यमातून अनेक विकासाच्या संधी आहे त्याच धर्तीवर भिल्ल समाज विकास मंडळ स्थापन व्हावे, यासाठी आपण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माध्यमातून निश्‍चितपणे प्रयत्न करू मात्र या समाजातील सर्व घटकांनी संघटितपणे राहून आपल्या न्याय हक्कांसाठी लढा दिला पाहिजे घटना बदलामागे आदिवासी समाजावर अनन्य असे अन्याय होण्याची शक्यता आहे त्यासाठी व्यवस्थेच्या विरोधात लढा उभारण्याची गरज आहे आगामी काळात विधानसभेसाठी मला संधी मिळाल्यास आपण आदिवासी समाजाच्या बांधवांसाठी निश्‍चित प्रयत्न करू आणि या घटकांना न्याय मिळवून देऊ असे ढाकणे शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सरोदे आभार योगेश रासने यांनी मानले.

COMMENTS