Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवाशातील अमरनाथ गु्रपच्या वतीने देवगड रस्त्यावर वृक्षारोपण

नेवासाफाटा :नेवासा येथील देवगड रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी जाणार्‍या अमरनाथ ग्रुपच्या वतीने देवगड जाणार्‍या हिरव्या माळरानावरील रस्त्यावर गुरुवारी

राहुरीत संताजी महाराजांची जयंती उत्साहात
..पुन्हा असे केले तर ख़बरदार…; भाजपने दिला शिवसेनेला इशारा
सख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू नसून घातपातच

नेवासाफाटा :नेवासा येथील देवगड रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी जाणार्‍या अमरनाथ ग्रुपच्या वतीने देवगड जाणार्‍या हिरव्या माळरानावरील रस्त्यावर गुरुवारी वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या अभियानात विविध जातींच्या सुमारे दीडशे वृक्षांची लागवड करण्यात आली. सदरचे वृक्ष लागवड अभियान तीन तास चालले.
          श्रावण मासाचे औचित्य साधून गुरुवारी दि.29 ऑगस्ट रोजी पहाटे 6 वाजता जेष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष लागवड अभियानास प्रारंभ करण्यात आला.श्रावण महिन्याच्या निमित्ताने देवगड रस्त्यावर विविध वृक्षांची लागवड मोहीम आम्ही पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हाती घेतली असून यामध्ये विविध प्रकारच्या सुमारे 150 वृक्षांची लागवड अमरनाथ ग्रुपचे सर्व सदस्य सहभाग घेऊन करत असून वृक्षारोपण उपक्रमाचा हा पहिला टप्पा असल्याचे अमरनाथ ग्रुपचे सदस्य नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले. अमरनाथ ग्रुपच्या वतीने आयोजित वृक्ष लागवड अभियानामध्ये अमरनाथ ग्रुपचे मार्गदर्शक नंदकुमार पाटील यांच्या समवेत रविंद्र जोशी, शशिकांत नळकांडे, ज्ञानेश्‍वर उगले, त्रिंबकराव गायकवाड,गणेश चौहान,योगेश रासने,जालिंदर गवळी, शंकर ओहोळ, अरुण धनक, रामनाथ जाधव टेलर, दिलीप जगदाळे, राजेंद्र महाजन, बजरंग ईरले, विठ्ठलराव साळुंके, अंबादास ईरले, होमगार्ड शकील शेख यांनी सहभाग नोंदवला. नेवासा येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अमरनाथ ग्रुपने या आधी ही गोशाळेला शेड देणे, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर घेतलेली आहे, शिक्षण घेणार्‍या गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप,स्वच्छता अभियान आदी उपक्रम राबविले असून सामाजिक कार्यात हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहे. नेवासा येथील नुकत्याच झालेल्या जळीतमध्ये निधी देऊन जळीतग्रस्त व्यापार्‍यांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. झालेल्या वृक्ष लागवड अभियानाचे अनेकांनी कौतुक करून अमरनाथ ग्रुपला धन्यवाद दिले.
 

COMMENTS