Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुग्णाच्या मृत्यूनंतरही ५ तास उपचार

ठाणे प्रतिनिधी - ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी रात्री रुग्णांच्या नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला. रुग्णालय प्रशासनाच्या

पंढरपूर पोटनिवडणुकीत दोन्ही बाजुने पाण्यासारखा पैसा वाहणार : राजू शेट्टी
एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन
… तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल – नवाब मलिक

ठाणे प्रतिनिधी – ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी रात्री रुग्णांच्या नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईंकांनी केला. रुग्णालयात डॉक्टर नसणे, रुग्णांकडे लक्ष न देणे, जेवण न देणे असे गंभीर आरोप करून नातेवाईकांनी रुग्णालय दणाणून सोडलं. रुग्णालयातील रुग्णांची होत असलेली गैरसोय नातेवाईकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली. तोपर्यंत ही बातमी कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कानावर गेली. रात्री उशिरा कळवा रुग्णालयात धाव घेत त्यांनी प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरलं. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात पाच जणांना आपले जीव गमवावे लागल्याचा आरोप करत आव्हाडांनी याबाबत डॉक्टरांना जाब विचारला. त्यावेळी आक्रमक झालेल्या आव्हाडांनी तेथील कर्मचारी आणि डॉक्टरांना शिवीगाळ करत ‘लाज नाही वाटत का XXX… ५ तास डेड बॉडी अशी ठेवतात का? बघू नको हं माझ्याकडे…. एक खानाखाली देईन’ अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला.. गेली अनेक दिवस झाले, ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयाबाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या .आज एका महिलेचा फोन आला की, तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत, परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये. काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता, रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो. तळपायाची आग मस्तकात गेली. त्या महिलेचा पती हा जनरल वॉर्ड मध्ये उपचार घेत होता. तेथे पोहचलो असता, संबंधित रुग्णाला ICU मध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे समजले. तिकडे गेल्यावर कळाले की त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तरी तेथील डॉक्टर्स आणि प्रशासन त्या रुग्णावर ५ तास उपचार करत होते. थोडक्यात रुग्ण आधीच दगावला होता. परंतु रुग्णालय प्रशासनाने याची काहीही माहिती त्या महिलेला दिली नव्हती. उलट ५ तास त्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे ते सांगत होते. याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना जाब विचारला असता, त्या प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टर लोकांची बोलती बंद झाली.

COMMENTS