विषाणूंचे पुनर्प्रस्थापन आणि …

Homeताज्या बातम्यासंपादकीय

विषाणूंचे पुनर्प्रस्थापन आणि …

जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा जगाला चिंतित करणारी सूचना केली असून, "मंकीपाॅक्स, या व्हायरसपासून जगाने सावधगिरी बाळगावी", असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपला बोध
दंगलीमागचे राजकारण
मोदी मित्रांच्या खिश्यात देश घालायला निघालेत

जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा जगाला चिंतित करणारी सूचना केली असून, “मंकीपाॅक्स, या व्हायरसपासून जगाने सावधगिरी बाळगावी”, असे त्यांनी म्हटले आहे. जग अजून कोव्हीड-१९ च्या धोक्यातून पूर्णपणे बाहेर आलेले नाही, तोच डब्ल्यूएच‌ओ’ ची सूचना जगाच्या चिंतेत भर करणारीच आहे. पंचवीस वर्षांपूर्वी भारताच्या रस्त्यावर, ‘ देवीचा रोगी कळवा, हजार रुपये बक्षीस मिळवा’, अशी जाहीरात अनेक ठिकाणी दिसायची. आता ही जाहीरात देखील नामशेष झाली. देवीचा रोग हा जीवघेणा नव्हता परंतु, प्रचंड वेदनादायी होता. त्यातच मनुष्याचा नैसर्गिक चेहरा किंवा त्वचेचे पूर्ण स्वरूप बदलून टाकणारा हा रोग हद्दपार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण केले गेले. नव्या पिढीला पोलिओ डोस निश्चितपणे माहीत असावा. पोलिओ’ चे समुळ उच्चाटन करण्यासाठी केंद्रीय पातळीवर विशेष मोहीम आखण्यात आली होती. या मोहीमेची सुरवात साधारणतः १९७२ ला झाली होती. परंतु, १९९१ पासून त्याची व्यापक मोहीम राबविण्यात आली. आजही ही मोहीम सुरूच आहे. पोलिओच्या निर्मूलनासाठीच्या मोहीमेला आज पन्नास वर्षे झाली. याचा अर्थ एखाद्या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी किती व्यापक आणि गंभीर प्रयत्न करावे लागतात, याचे हे निदर्शक आहे. त्याचप्रमाणे देवीचा रोग हा १९७७ मध्येच हद्दपार झाला. परंतु, १९७८ पासून त्याविरोधात प्रतिकार शक्ती वाढविण्याचे लसीकरण सुरू झाले. १९८५ मध्ये ही मोहीम जागतिक पातळीचा भाग बनली. भारतात सन २०१२ पर्यंत उत्तर भारतात ही मोहीम सुरूच होती. कोणत्याही रोगाचे निर्मूलन करणे हे अतिशय जिकीरीचे कार्य असले तरी जागतिक पातळीवर सांघिक प्रयत्नांच्या आधारे ते साध्य केले जाऊ शकते.‌२०१९ च्या शेवटच्या काळात कोविड-१९ विषाणू सापडला आणि जग एका भयावह संकटात सापडले. त्या संकटातून अजून जगाची पूर्णपणे सुटका झाली नसतानाच जागतिक आरोग्य संघटनेने जगाची चिंता वाढविणारी सूचना केली. मंकीपाॅक्स हा विषाणू देवी च्या रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूच्या वर्गातील विषाणू. आधुनिक जगाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक नैसर्गिक संकटातून बाहेर येण्याचे आव्हान पेलले आहे. ज्या विषाणूंचा जगाने सांघिकपणे नायनाट केला; तेच विषाणू पुन्हा जगावर अतिक्रमण करित असून जागतिक लोकसंख्येला आरोग्यावर प्रचंड खर्च करायला भाग पाडत आहेत. कोरोना काळात जगाने याचा अनुभव घेतला. दीर्घकाळ हाॅस्पिटलायझेन आणि लाखोंचा वैद्यकीय खर्च हे कोरोना काळाचे वास्तव आहे. हे थोडे म्हणून की काय, तेव्हढ्यात पुन्हा मंकीपाॅक्स या विषाणूचे आक्रमण एकंदरीत विषाणूंपेक्षा त्यामागच्या रणनितीचा अधिक विचार करायला भाग पाडत आहेत. जे विषाणू जगाने सांघिकपणे इतिहास जमा करून टाकले ते अतिशय आक्रमकपणे पुनर्रप्रस्थापित कसे होताहेत, हा प्रश्न आता जगासमोर उभा राहिला आहे. विज्ञान – तंत्रज्ञान अतिशय विकसित होत असताना त्यात जागतिक पातळीवर नव्या भांडवलदारांचा उदय झाला असून तेच आता पैसे कमविण्यासाठी अशा विषाणूंच्या संदर्भात काही छेडछाड करित आहेत का, असा संशय कोरोना काळापासून व्यक्त केला जात आहे. त्यातच आता मंकीपाॅक्स ची भर पडल्याने जगभरच्या नागरिकांचा संशय वाढीस लागला आहे.‌ जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात विशेष मोहीम राबवून यातील सत्यशोधन करावे, जेणेकरून जगाच्या जीवावर उठलेले हे रोग कायमचे कसे प्रतिबंधित होतील, यावर लक्ष केंद्रीत करावे. कोरोना काळात लाॅकडाऊन अनुभवलेल्या जनतेची सहनशीलता संपली आहे. कारण, त्यांना रोजगाराअभावी भूकेच्या मोठ्या संकटाचा सामना याकाळात करावा लागला आहे. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने आधी घ्यावी अन् मगच एकंदरीत सूचना कराव्यात, हेच अधिक योग्य ठरेल.

COMMENTS