Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हे कारखान्याच्या पाच शेतकरी सभासदांना ऊस शेतीचे प्रशिक्षण

कोपरगाव प्रतिनिधी ः राज्यातील उस उत्पादक शेतकर्‍यांना अत्याधुनिक पध्दतींने उस लागवड करून जास्तीचे उत्पादन कसे घ्यायचे याबाबत वसंतदादा शुगर इन्स्ट

महापालिकेत पसरला आनंदोत्सव…132 जणांना पदोन्नती
जिल्हाचा महसूल विभाग अव्वल…चक्क लाचख़ोरीतही…
ढोरज्यात आधारकार्ड दुरुस्ती, अपडेट शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोपरगाव प्रतिनिधी ः राज्यातील उस उत्पादक शेतकर्‍यांना अत्याधुनिक पध्दतींने उस लागवड करून जास्तीचे उत्पादन कसे घ्यायचे याबाबत वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट (पुणे) गेल्या 33 वर्षापासुन उस शेतीचे प्रशिक्षण देत असुन त्या अंतर्गत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या पाच उस उत्पादक सभासद शेतकर्‍यांनी पुणे (मांजरी) थेट सहभाग देत हे प्रशिक्षण पुर्ण केले त्याबददल त्यांचे कारखान्याचे अध्यक्ष विवेक  कोल्हे यांनी अभिनंदन करून शेतकर्‍यांनी यातुन मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग शेजारील व कार्यक्षेत्रातील अन्य शेतकर्‍यांना करून द्यावा असे आवाहन केले आहे.
           उस व साखरेची राज्याची उत्पादकता वाढावी उस शेतीबाबत आधुनिक तंत्रान शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहोचावे व त्याचा वापर प्रत्यक्ष शेतीत व्हावा हि काळाची गरज असुन त्या उददेशाने मांजरी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट गेल्या 33 वर्षापासुन उस उतदक पुरूष शेतक-यांसाठी उस शेती ज्ञानयाग व महिला शेतक-यांसाठी 17 वर्षापासुन उस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रम राबविते त्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे सर्वश्री किरण आनंदराव वक्ते, ज्ञानेश्‍वर भगिरथ वक्ते, एकनाथ गेणुजी पानगव्हाणे, प्रतिक विजय आहेर व प्रसाद रमेश टेके या पाच शेतक-यांना थेट पुणे प्रशिक्षणासाठी पाठविले होते या शेतक-यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

COMMENTS