Homeताज्या बातम्यादेश

प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या

कोलकाता ः पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह शुक्रवारी कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात आढळून आला. प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात

आंचल चिंतामणीने मिळविले दुसर्‍यांदा सुवर्णपदक
ओबीसी आरक्षण आणि ऍड. प्रकाश आंबेडकर !
जुनी गंगा जगदंबा देवी मंदिरालगतचा रस्ता खुला करा ः स्नेहलता कोल्हे

कोलकाता ः पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह शुक्रवारी कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात आढळून आला. प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्यानंतर डॉक्टरांनी रस्त्यावर उतरून शनिवारी जोरदार निदर्शने केले. श्‍वविच्छेदन अहवालानुसार महिलेचे डोळे, तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत होता. तसेच तिच्या पोटावर, डाव्या पायाला, मानेला, उजव्या हाताला, अनामिकेला आणि ओठांना जखमा आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण आत्महत्येचे नाही. बलात्कारानंतर खून झाला.

COMMENTS