Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर शहरातील ट्रॉफीक सिग्नलचे काम सुरु; अनेक दशकाचा प्रलंबीत प्रश्‍न मार्गी : निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) या योजने अंतर्गत सन 2020-21 मधील नगरपालिकेला एकूण प्राप्त झालेल्

ओगलेवाडीत जिवंत कासव, मांडूळ विक्रीसाठी घेवून फिरणारे चौघे वनविभागाच्या ताब्यात
पत्रकार राहूल तपासेंना जीवे मारण्याचा प्रयत्न : महामार्गावरील घटना; एकजण ताब्यात
माजी ज्येष्ठ मंत्री डॉ. आण्णासाहेब डांगे यांनी बजावला मतदानाचा हकक

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) या योजने अंतर्गत सन 2020-21 मधील नगरपालिकेला एकूण प्राप्त झालेल्या निधीतील लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्या अधिकारातील 15 टक्के निधीतून शहरातील कोल्हापूर नाका व कामेरी नाका येथे प्रत्यक्षात वहातुक नियंत्रक ट्रॉफीक सिग्नलचे काम सुरु करण्यात आले असल्याची माहिती उरुण-इस्लामपूर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी दिली.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, विकास आघाडी व मित्र पक्ष शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. विकास कामे ही मार्गी लावण्यात आली आहेत. काही मंजूर कामे शहरात आजही सुरु आहेत. शहराला गेल्या अनेक दशकापासून वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. कोल्हापूर नाका व कामेरी नाका हे शहराचे प्रवेशद्वार असून या ठिकाणी गेल्या अनेक दशकापासून वहातुक कोंडी होऊन छोटे-छोटे अपघात ही होत होते. अनेक प्रवाशांचा वाहतूक कोंडीमुळे वेळ वाया जात होता. मानसिक ही त्रास सहन करावा लागत होता. मी स्वत: लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर असताना ही रस्त्यावर उतरुन ही वाहतुक कोंडी सुरळीत केली आहे. त्यामुळे हा प्रश्‍न कायम स्वरुपी मार्गी लावण्याचा निर्णय घेतला.
सन 2020-21 मधील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) मधील एकूण आलेल्या निधीतून 15 टक्के निधी लोकनियुक्त नगराध्यक्षांना विकासकामासाठी वापरण्याचा अधिकार शासन निर्णयामुळे प्राप्त झाल्याने दि. 15/12/2020 रोजीच्या नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेमध्ये मी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून कोल्हापुर नाका व कामेरी नाका येथे वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॉफीक सिग्नल यंत्रणा बसविण्याबाबत विषय पत्रिकेमध्ये घेवून मंजूर करण्यात आला होता. यासाठी एकूण निधी 15,84,155 रुपये इतका निधी खर्च करण्यात येणार आहे.
वाहतुक नियंत्रण ट्रॉफीक सिग्नलमुळे गेल्या अनेक दशकापासून प्रलंबीत असणारा प्रश्‍न मार्गी लागल्याने वाहतुकदार, प्रवाशी व शहरवासियांतून समाधान व्यक्त होत आहे. यामुळे शहर विकासात भर पडली असून याचे आता प्रत्यक्षात काम सुरु झाल्याने या कामाचे मला ही समाधान आहे. हे काम दर्जेदार होण्याच्या दृष्टीने संबधीत ठेकेदार व नगरपालिकेचे प्रशासनांना सुचना देण्यात आल्या आहेत. यापुढे विकास आघाडी व मित्र पक्ष शिवसेना शहर विकासासाठी कटीबध्द रहाणार असल्याचे निशिकांत भोसले-पाटील यांनी सांगितले.

COMMENTS