Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

मुंबई: मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. कसाराकडे जाणारी वाहतूक पूर्ण बंद झाली आहे. खर्डी-कसारादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झा

मध्य रेल्वेची लोकल सेवा पुन्हा खोळंबा
मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाने वाचवले 44 प्रवाशांचे जीव
मध्य रेल्वेवर तीन दिवस पॉवर ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. कसाराकडे जाणारी वाहतूक पूर्ण बंद झाली आहे. खर्डी-कसारादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कसार्‍याकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वेची अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून इंजिनमध्ये दुरुस्ती करण्याचे काम सुरु आहे. अर्ध्या तासा पासून वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. दुरुस्तीसाठी आणखी आर्धा तास लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल देखील खर्डी-उंबरमाली दरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडले होते. बुधवारी पुन्हा याच डाऊन मार्गावर मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुन्हा लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

COMMENTS