शिक्रापूर प्रतिनिधी - शिक्रापूर ता. शिरूर येथे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी याठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्
शिक्रापूर प्रतिनिधी – शिक्रापूर ता. शिरूर येथे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी याठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज हल्ल्याचा व त्यांना पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कडकडीत बंद पाळण्यात आला असून या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असेलल्या बंदला प्रतिसाद देत काही शिक्रापूर व्यापारी संघटनांनी बंदचा निर्णय घेत सोमवारी सायंकाळी उशिरा शिक्रापूर पोलिसांना निवेदन देत बंद पुकारत असल्याचा निर्णय जाहीर करत सोशल मीडियावर बंद बाबत संदेश देऊ केला मात्र सायंकाळी उशिरा अचानक बंदच्या निर्णयाने अनेक व्यापारी व व्यावसायिक संभ्रमात पडले त्यानंतर आज सकाळी व्यवसायिकांनी बंद पुकारला मात्र काही व्यवसायिकांनी आपले व्यवसाय सुरू ठेवले असताना गावातील काही तरुणांना त्यांचे व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले परंतु अनेक ठिकाणी वाईन शॉप उघडे असल्याने व काही संघटनांनी घेतलेल्या मनमानी निर्णयाने अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून शिक्रापूर येथील बंद शांततेत पार पडला आहे.
व्यापारी संघटना नेमक्या कशा ? – शिक्रापूर येथे दीड हजार हून अधिक लहान मोठे व्यावसायिक असून गावामध्ये दोन व्यापारी संघटना उदयास आलेल्या आहे, मात्र या व्यापारी संघटना बाबत अनेक व्यवसायिकांना काहीही माहिती नसून त्यांनी घेतलेले निर्णय देखील मोजक्या लोकांमध्ये घेतले जात असून व्यापारी संघटना नेमक्या कोणत्या, कोणाच्या व कशा असा प्रश्न व्यवसायिकांना पडला आहे.
COMMENTS