Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जावळी तालुक्यात रब्बीच्या पेरणीस बैलजोडीला ट्रॅक्टरचा पर्याय

कुडाळ / वार्ताहर : गेली दहा-बारा दिवसांपासून परतीचा पाऊस गेल्याने रखडलेल्या खरिपाच्या पिकांची काढणी पूर्ण करून रब्बीच्या पिकांची पेरणीसाठी शेतक

४०० फूट खोल दरीत कोसळणारी कार झाडावर अडकली l LokNews24
वाळवा तालुका गुलामगिरीतून मुक्त करा : निशिकांत पाटील
दागिने पॉलिश करून देण्याचा बनाव करून पाच तोळे सोने लंपास

कुडाळ / वार्ताहर : गेली दहा-बारा दिवसांपासून परतीचा पाऊस गेल्याने रखडलेल्या खरिपाच्या पिकांची काढणी पूर्ण करून रब्बीच्या पिकांची पेरणीसाठी शेतकरी मशागतीची कामे उरकत आहे. पावसाने उघडीप दिली असल्याने सोयाबीन, भुईमूग व इतर कडधान्यांची काढणी झालेल्या शेतात रब्बीच्या पेरण्या करण्यात शेतकरी व्यस्त आहे. सध्या तालुक्यातील कुडाळ, सायगाव, हुमगाव याभागात शेतकर्‍यांची रब्बीच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
रब्बीच्या हंगामात जावळी तालुक्यात प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा इत्यादी पिके घेतली जातात. पावसाने रब्बीची पेरणी उशिरा होत असली तरी मुबलक पाणी असल्यामुळे उत्पन्नाला फटका बसणार नाही अशी शेतकर्‍यांना आशा आहे. सध्या रब्बी पेरणीसाठी वातावरण पोषक असून परिसरातील शेतकर्‍यांनी ज्वारी, हरभरा तर काही शेतकर्‍यांनी गहू पेरणीस सुरुवात केली आहे. शेतीला योग्य वापसा असल्याने पेरणीसाठी लगबग सुरू आहे. दरम्यान, विविध भागांत शेतकर्‍यांनी रब्बीच्या पेरणीसाठी मशागती पूर्ण केल्या असून पेरणी सुरू केली आहे.
यावर्षी परतीच्या पावसाने नाकीनऊ आणले होते. सरासरीहून अधिक पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले.काही ठिकाणी सोयाबीन पाण्यात होते. यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका सहन करावा लागला. सध्या शेतीची मशागत करण्याच्या कामांत शेतकरी गुंतलेला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली जात असल्याने काही शेतकर्‍यांनी रब्बी पेरणीलाही सुरुवात केली आहे.
परतीच्या पावसाने विश्रांती दिल्याने पहाटेची थंडीला सुरुवात झाली आहे. वाफसा आलेल्या शिवारात शेताची मशागत करून रब्बीची पेरणी सुरू झाली आहे. बैलजोड्यांची संख्या कमी झाल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या सहायाने पेरणी होत आहे. गेल्या 10-12 दिवसात पावसाने उघडीप दिल्याने खरिपाच्या पिकांची काढणी पूर्ण होत आली आहे. यामुळे रब्बीच्या पेरणीसाठी शेतकर्‍यांनी नियोजन केले असून पेरणीला सुरुवात केली आहे.

COMMENTS