Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दौंडमधील कंपनीत विषारी वायूची गळती

एका कामगाराचा मृत्यू, दोघे अत्यवस्थ

पुणे ः पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात मोठी दुर्घटना घ़डली आहे. येथील एका रासायनिक कंपनीत विषारी वायूची गळती झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आ

खाजगी पेट्रोलियम कंपन्यांचा देशहिताकडे कानाडोळा !
मोकाटेवरील दाखल गुन्हा खोटा असल्याचा दावा ; पत्नीचे जिल्हा पोलिस प्रमुखांना निवेदन
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील कॅफे मालकाला अटक

पुणे ः पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात मोठी दुर्घटना घ़डली आहे. येथील एका रासायनिक कंपनीत विषारी वायूची गळती झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन कामगारांची प्रकृती अत्यावस्थ असल्याचे सांगितले जात आहे. दौंड तालुक्यातील भांडगाव येथे असणार्‍या एका कंपनीत ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील भांडगाव येथील एका कंपनीत गुरूवारी रासायनिक ऍसिडचे ड्रम पडून आग लागल्याची घटना घडली. ही आग विझवण्यासाठी अग्निबंबाचा वापर केल्याने परिसरात विषारी वायू तयार झाला. या विषारी वायुच्या संपर्कात आल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीत ऍसिड ड्रम अचानक पलटी झाल्याने कंपनीत अचानक आग लागली. ही आग विझविण्यासाठी कामगारांनी तातडीने अग्निबंबाचा वापर केला. ही आग विझवताना मोठ्या प्रमाणात विषारी धूर तयार झाला होता. हा धूर कामगारांच्या नाका तोंडात गेला होता.

COMMENTS