Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पर्यटकांचे मोबाईल पळवणारे गजाआड

पोलिसांनी केले लाखो रुपयांचे मोबाईल जप्त

पुणे/प्रतिनिधी ः पुणे जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर आणि त्यातही श्रावण महिन्यामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र या गर्दीमध्

जन्मदात्या आईची डोक्यात दगड घालून हत्या | LokNews24
सरकार नव्हे, आमदारच प्रशासनाच्या दारी
ह.भ.प. गोविंद महाराज शिरोळे यांना इंडियन पिनाकल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 

पुणे/प्रतिनिधी ः पुणे जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर आणि त्यातही श्रावण महिन्यामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र या गर्दीमध्ये हात साफ करणारे अनेक चोरटे असतात. अशाच एका मोबाईल चोरट्यांचा पोलिसांनी पर्दाफाश करत त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचे मोबाईल जप्त केले आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा, खंडाळा ही गावे पर्यटनाचे माहेरघर आहे. लोणावळ्यात दरवर्षी वर्षाविहारसाठी पर्यटकांची गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेऊन किंवा गाड्यांमध्ये ठेवलेले मोबाईल चोरुन नेणारा पोलिसांच्या सापळ्यात आला आहे. त्या व्यक्तीकडून लाखो रुपये किंमतीचे शेकडो मोबाईल जप्त करण्यात आले आहे. या आरोपीकडून आणखी इतर गुन्हेही उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभरातून वर्षाविहारासाठी लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांचे मोबाईल कारमधून चोरीला जात होते. पार्किंगमध्ये ठेवलेल्या गाड्यांच्या काचा फोडून मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम घेऊन चोरटा पसार होत होता. यासंदर्भातील तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. यामुळे या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर आरोपी अखिल सलीम व्होरा हा लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सापळ्यात अडकला. लोणावळा पोलिसांनी आरोपी अखिल सलीम व्होरा याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून बारा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शेकडो मोबाईल त्याच्याकडे होते. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाड्यांच्या काचा फोडून आरोपी अखिल गाड्यांमधील मोबाईल अन् रोख रक्कम इतर मौल्यवान वस्तू आणि पर्स चोरून पळ काढायचा. अखेर त्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. एकीकडे वर्षाविहाराचा आनंद घेणारे पर्यटक चोरीच्या घटनांमुळे वैतागले होते. या घटनांमुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडत होते. पर्यटकांकडून चोरी केलेल्या मालावर मौजमजा करणारा हा चलाख चोर लोणावळा पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. पोलिसांनी त्याला चार चाकीसह जेरबंद केले.

COMMENTS