तरुणीवर अत्याचार करून पैशांसाठी धमकावले, गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुणीवर अत्याचार करून पैशांसाठी धमकावले, गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तरूण प्रदीप आण्णासाहेब पंडीत याने नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या तरुणीवर अत्याचार क

श्रीपाद छिंदमकडून टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण l LokNews24
भाईजान सलमान खानला शुभेच्छा देण्यासाठी चाहता निघाला सायकलवर
मठमंदिर समिती तर्फे (तर्पण) सामुदायिक श्राध्द विधीची विनामुल्य व्यवस्था

अहमदनगर/प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तरूण प्रदीप आण्णासाहेब पंडीत याने नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या तरुणीवर अत्याचार केला व तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे पैशाची मागणी केल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात अत्याचार व खंडणी या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत. पिडीत तरुणी व प्रदीप पंडीत हे दोघे नागापूर एमआयडीसीत कंपनीमध्ये कामाला होते. त्यांच्यामध्ये ओळख होती. 23 जानेवारी 2022 रोजी प्रदीपने तिला गाडीवर बसवून नगर-कल्याण महामार्गावरील एका हॉटेल मध्ये नेले. तेथे तिच्या अतिप्रसंग केला. नंतर तिला फोन करून,‘खात्यावर पैसे टाक, नाहीतर मी तुझी बदनामी करेल’, असे म्हणून पैशाची मागणी केली. तिने काही दिवस पैसे पाठविले. नंतर त्याने फोटो व्हॉट्सअपद्वारे स्टेटसला व्हायरल करतो, अशी धमकी देऊन खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

COMMENTS