Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खून झालेल्या महिलेवर अत्याचार ? व्हिसेरा ठेवला राखून

छत्तीसगडची महिला, ओळख पटवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू

अहमदनगर प्रतिनिधी - रेल्वे स्टेशन परिसरातील आगरकर मळा भागात असलेल्या इंगळे वस्तीवर मंगळवारी मृतावस्थेत सापडलेल्या महिलेवर अत्याचार झाल्याचा संशय

कोपरगावच्या रस्ते नुतनीकरणासाठी 80 लाखाच्या निविदा प्रसिद्ध ः आमदार काळे
बाळासाहेब थोरातांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणार्‍या महिला पकडल्या…

अहमदनगर प्रतिनिधी – रेल्वे स्टेशन परिसरातील आगरकर मळा भागात असलेल्या इंगळे वस्तीवर मंगळवारी मृतावस्थेत सापडलेल्या महिलेवर अत्याचार झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी या महिलेच्या उत्तरीय तपासणीनंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे. दरम्यान, संबंधित महिला छत्तीसगड येथील असल्याचे समजते. तिच्याजवळ सापडलेल्या डायरीतील माहितीच्या आधारे तिची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांचे सुरू आहे.

महिलेचा खून करून मृतदेह रेल्वे स्टेशन भागात मोकळ्या पडीक शेतामध्ये आणून टाकला होता. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. या मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला सिमेंटचा ब्लॉकही होता. त्यामुळे सिमेंटच्या ब्लॉक डोक्यात घालून तिचा खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. तसेच या महिलेवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर व्हिसेरा राखून ठेवला असून तो नाशिक येथे तपासणीसाठी पाठविला असल्याची माहिती कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली.

मंगळवारी सकाळी इंगळे वस्ती, रेल्वेस्टेशनच्या पश्‍चिमेस असणार्‍या मोकळ्या पडीक शेतात एका 35 ते 40 वर्ष वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला होता. जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली असता महिलेचा मृत्यू डोक्यात मार लागून झाल्याचा अहवाल देण्यात आला. यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या महिलेची ओळख पटविण्याचे काम कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. तेथील दुकानदार, फेरीवाले यांच्याकडेही चौकशी केली. महिलेजवळ आढळून आलेल्या डायरीमध्ये ती छत्तीसगड येथील असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांचे एक पथक तेथे पाठविण्यात येणार असल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

COMMENTS