Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्यालय ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस चे आज ठिय्या आंदोलन

इस्लामपूर / प्रतिनिधी  : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ( ठाकरे गट )आदिंची  महाविकास आघाडी आहे. या महाविकास आघाडीत काँग्रेस कमिटी इमारत

अवघ्या दहा तासात मोटरसायकल चोरास अटक
विहिरीत पडलेल्या गव्याला वनविभागाकडून जिवदान
सांगली बँकेस 18 जागांसाठी 85.31 टक्के मतदान

इस्लामपूर / प्रतिनिधी  : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ( ठाकरे गट )आदिंची  महाविकास आघाडी आहे. या महाविकास आघाडीत काँग्रेस कमिटी इमारतीच्या प्रश्नावरून काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यामध्ये मोठा वाद होण्याची शक्यता आहे. हा वाद टाळण्यासाठी आम्ही वारंवार राष्ट्रवादीशी चर्चा करीत आहे. राष्ट्रवादी पक्षाने चर्चेची दारे बंद केल्याने काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर तालुका व शहर काँग्रेच्या वतीने ११ ते ३ वेळेत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती  महाराष्ट्र राज्य काँग्रेस अल्पसंख्यांक राज्य उपाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेस सरचिटणीस विजय पवार उपस्थित होते.

ते म्हणाले, ”  काही दिवसापूर्वी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी शहर व तालुका अध्यक्ष यांच्या सोबत शासकीय विश्रांमगृहात बैठक घेतली होती. त्यावेळी या प्रश्नावर तोडगा निघेल असे अपेक्षित होते. परंतु राष्ट्रवादी च्या पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडे या इमारती संबंधित कागद पत्र आहेत.वेळ आल्यावर दाखवू असे सांगितले. काँग्रेस च्या पदाधिकार्यांच्या चर्चेला प्रतिसाद दिला नाही.चर्चेने मार्ग निघेल असे अपेक्षा होती. 

राज्यात एकमेव इस्लामपूर येथे काँग्रेस कमिटीचे कार्यालय राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात आहे. काँग्रेस कमिटीचे लाईट बिल व पाणीपट्टी बिल वाळवा दूध संघाच्या नावे निघत आहे. घरपट्टी काँग्रेस कमिटीच्या नावे निघत आहे. साधारण साडेतीन गुंठे जमिनीचे क्षेत्र काँग्रेस कमिटीच्या नावे आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी हा प्रश्न लवकर निकाली लावणे महत्वाचे आहे. आमची विनंती आहे की आपल्या निर्याची वाट पाहून ठिय्या आंदोलन करीत आहे. पहिला टप्पा ठिय्या आंदोलनाचा आहे. त्यानंतर पुढची दिशा ठरवली जाणार आहे.

COMMENTS