गेल्या दोन दिवसांपासून देशभरात पंतगोत्सवाची धूम सुरु आहे. पंतग उडवण्याचा आनंद अनेकजण लुटतांना दिसून येत आहे. पंतगांची दोर हवेत झेपावत असतांना प्र

गेल्या दोन दिवसांपासून देशभरात पंतगोत्सवाची धूम सुरु आहे. पंतग उडवण्याचा आनंद अनेकजण लुटतांना दिसून येत आहे. पंतगांची दोर हवेत झेपावत असतांना प्रत्येकाला होणारा आनंद अवर्णनीय असतो. मात्र हाच पतंगांचा दोर अनेकांच्या आयुष्याची दोरी जेव्हा कापतो, तेव्हा मात्र मनाला विचार करावासा वाटतो. खरंच आपला आनंद द्विगुणीत करण्यासाठी नायलॉनचा मांजा वापरण्याची गरज आहे का ?
केवळ मानवी चुकांमुळे अनेकांना हक-नाक आपला जीव गमवावा लागत आहे. तर अनेक जखमी होतांना दिसून येत आहे. रस्त्यावर वावरणार्या प्रत्येकाची कोणतीही चुक नसतांना, त्यांना हक-नाक मानवी चुकांमुळे या मांजामध्ये अडकावे लागते. त्यामुळे जखमी झाल्यास उपचारांवर होणारा खर्च, जखमी असल्यामुळे रोजगारांवर टाकावी लागणारी सुट्टी, मानसिक, शारीरिक त्रास आणि वित्तहानी, या सगळया बाबी त्या निरपराधांना सोसाव्या लागतात. त्या केवळ मानवी चुकांमुळे. मानवाला मांजाचे दुष्परिणाम माहीत असून देखील तो पंतगांसोबत जोडण्यात येतो. जेणेकरून आपला पंतग कुणी कापण्याची हिंमत करू नये. मात्र आपला पंतग वाचवण्यासाठी आपण कुणाच्या तरी आयुष्याची दोरी कापत असतो, याचे भान आपल्याला असायला हवे. मांजाचे प्रताप आजचेच नाहीत. त्यामुळे त्याच्यावर बंदी आणण्यासाठी अनेक स्वयंसेवी संघटनानी पोलिसांना साकडे घातले होते. हायकोर्टातही याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र नायलॉन मांजावर कठोर बंदी आणण्याची खरी गरज आहे. जर मांजा बाळगणे, आणि तो विकणे यावर कठोर शिक्षेची तरतूद करण्यास आली तर, नॉयलान बाजारात येणार नाही. आणि अनेकांचे जीव वाचतील. नायलॉन मांजा विक्री करू नये, तो जवळ बाळगू नये, यासाठी पोलिसांनी कारवाई करण्यात येत असली तरी, ती कारवाई तोकडीच म्हणावी लागेल. माणसांप्रमाणेच अनेक पक्षीही या मांजामुळे घायाळ झाले. संक्रांतीच्या दिवशी माणसांच्या आनंद साजरा करण्याचा मोठा फटका गेल्या काही वर्षांत मानवांबरोबर पक्ष्यांना वारंवार बसू लागला आहे
गेल्या दोन दिवसांत केवळ महाराष्ट्रामध्ये नायलॉन मांजा अडकून मृत्यू होणार्यांची संख्या दोन आकडयात आहे. विशेष म्हणजे हा मांजा केवळ प्रौढ व्यक्तींचाच घात करत नसून, त्याने चिमुरडयांना देखील सोडले नाही. त्यामुळे या जीवघेण्या मांजामुळे आपल्याला आनंद द्गिगुणीत साजरा करायचा की, अनेकांच्या आयुष्याची दोर बळकट करायची, हा सर्वस्वी निर्णय आपल्यावर आहे. त्यामुळे शक्यतो नायलॉन मांजा टाळून पतंग उडवता येतो, आणि तो चांगल्याप्रकारे हवेत झेपावतो देखील. त्यामुळे जीवघेण्या नायलॉन मांजाला आपल्या सर्वांच्या जीवनातून हद्दपार करण्याची गरज आहे.
नायलॉन मांजा एका खास प्रक्रियेने तयार करून मजबूत बनविला जातो. मात्र, हा मांजा दुचाकीस्वारांसाठी धोक्याचा ठरतो. अनेकजण दरवर्षी जखमी होतात, तर काही जणांच्या जिवावरदेखील बेतते. ही बाब लक्षात घेता पोलिसांकडून कारवाई वाढविण्यात आली आहे. नायलॉन मांजामुळे प्राणी-पक्ष्यांनादेखील धोका संभवतो. आतापर्यंत अनेक पक्षी जायबंदी झाले आहेत. याशिवाय लहान मुलांचेदेखील गळे कापले गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. दुचाकीस्वारांसाठी नायलॉन मांजा प्रचंड धोकादायक आहे. दुचाकीवरून जात असताना समोर मांजा आल्यावर गाडीचा तोल सावरत नाही. एकीकडे मांजामुळे होणारा आघात व दुसरीकडे वाहनाचा वेग यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. दरवर्षी असे अनेक अपघात होताना दिसून येतात. विशेषत: उड्डाणपुलावर वाहन चालविताना विशेष काळजी घ्यायची गरज असते. त्यामुळे या धोकादायक मांजावर बंदी घालण्याची गरज आहे.
COMMENTS