Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठाणे-पालघर जिल्ह्यातील प्रश्‍न प्रामुख्याने सोडवू : चैतन्य दळवी

पाटण / प्रतिनिधी : श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आज रविवार, दि

शासकिय आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती बंधनकारक
जुन्या रागातून भैरोबा मंदिरासमोर मनसेच्या कार्यकर्त्याचा खून
कृष्णा विश्‍व विद्यापीठाचा शुक्रवारी 11 वा दीक्षांत सोहळा

पाटण / प्रतिनिधी : श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आज रविवार, दि. 17 एप्रिल रोजी भिवंडी तालुक्यातील रोहिने गाव येथे कोयना प्रकल्पग्रस्तांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात मोठ्या संख्येने कोयना प्रकल्पग्रस्त नागरिक सहभागी झाले होते.
राज्याचे उपमुख्मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. भारत पाटणकर यांच्या समवेत 5 एप्रिल रोजीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची या मेळाव्यात माहिती देण्यात आली. तसेच 1 मे पासून जमीन वाटपाची होणारी प्रक्रिया व त्या संबंधी असलेल्या अडी-अडचणी बाबतचे त्रुटी कसे दूर करावे, याबद्दल उपस्थित कोयना प्रकल्पग्रस्तांना माहिती देण्यात आली. तसेच ठाणे, पालघर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न प्रामुख्याने सोडवू, असे आश्‍वासन श्रमिक मुक्ती दल संघटनेचे युवा नेते चैतन्य दळवी यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्तांना दिले. श्रमिक मुक्ती दल संघटनेचे सचिन कदम, महेश शेलार, सीताराम पवार, बाळकृष्ण कदम, रमेश कदम, आशिष मोरे, मोहन कदम, दिलीप कदम, आकाश कांबळे, प्रमोद कांबळे, विलास कदम, रवींद्र मोरे, तानाजी बेबले उपस्थित होते. या कोयना प्रकल्पग्रस्त मेळाव्यात ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व गावातील प्रतिनिधी उपस्थित होते.

COMMENTS