Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या  धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा : डॉ. प्रितेश जुनागडे

श्रध्दा ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे व्याख्यानाचे आयोजन

नाशिक : रक्ताची कामतरता स्त्रियांमध्ये कमी असल्याने त्यांच्यामध्ये ऍनिमियाची समस्या अधिक प्रमाणात आढळते. स्वास्थ्यकारक आरोग्यासाठी शरीरात योग्य प

संगमनेर तालुक्यातील पर्यटन विकासासाठी 3 कोटीचा निधी मंजूर
राज्यात 5 ठिकाणी उर्दू घर निर्मितीचे काम प्रगतीपथावर : नवाब मलिक
महाविकास आघाडी अडचणीत

नाशिक : रक्ताची कामतरता स्त्रियांमध्ये कमी असल्याने त्यांच्यामध्ये ऍनिमियाची समस्या अधिक प्रमाणात आढळते. स्वास्थ्यकारक आरोग्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात रक्त असणं आवश्यक आहे. अन्यथा अनेक समस्या वाढण्याचा धोका असतो. रक्त बनण्याचं प्रमाण कमी झाल्यास हाडं कमजोर होतात. याचा परिणाम डोळ्यांवरही होतो. मेंदूच्या कार्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विस्मृतीचा त्रास होतो. शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करावा असे प्रतिपादन लोटस हॉस्पीटलचे रक्तविकार तज्ञ डॉ. प्रितेश जुनागडे यांनी केले.

श्रध्दा ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे आयोजित व्याख्यानात डॉ. प्रितेश जुनागडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश अडबे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम पांडे, लोकज्योती मंचचे कोषाध्यक्ष जितेंद्र येवले, सचिव देवकिसन व्यास, कोषाध्यक्ष डी.टी.कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी डॉ. जुनागडे म्हणाले की, शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे काही लोकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, सतत थकवा जाणवतो. अशा आणि विविध समस्या तुम्हाला जाणवत असतील तर तुमच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असण्याचे लक्षणे आहेत. यासाठी शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा, एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस नेहमी प्यावा, सफरचंदाच्या ज्युसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकावा. कारण या मिश्रणात लोहचे प्रमाण जास्त असते. किंवा नियमित बीट खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते, रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खावा, चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे, दोन चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून तिळाची पेस्ट करुन घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातुन दोन वेळेस हे मिश्रण खावे. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी मंडळाच्या सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले तसेच सुरुवातीला देवकिसन व्यास यांनी डॉक्टरांचा परिचय करून दिला. यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

COMMENTS