Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचा लोकप्रतिनिधी नसल्याने उपोषण करण्याची वेळ:- क्षितिज घुले 

पाथर्डी प्रतिनिधी - शेवगाव-पाथर्डीच्या प्रश्नांसाठी एक दिवस मंत्रालयाचे गेट बंद करेल असा हक्काचा लोकप्रतिनिधी नसल्याने आपल्याला आज पाथर्डीमध्ये उ

माजी प्राचार्य कानवडे यांना आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान    
कोल्हे यांनी स्वतःच्याच नगरसेवकांना फसवून-अंधारात ठेवून माझ्याकडे अर्ज दिला-नगराध्यक्ष वहाडणे
आ. रोहित पवार युवकांसह करणार उपोषण

पाथर्डी प्रतिनिधी – शेवगाव-पाथर्डीच्या प्रश्नांसाठी एक दिवस मंत्रालयाचे गेट बंद करेल असा हक्काचा लोकप्रतिनिधी नसल्याने आपल्याला आज पाथर्डीमध्ये उपोषण करण्याची गरज पडत आहे.ही पहिली वेळ नसून अहमदनगर पाथर्डी रस्त्यासाठी ही आपल्याला उपोषण करण्याची वेळ आली होती असे प्रतिपादन शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज घुले यांनी भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौड यांनी पाथर्डी व शेवगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा व यादीत कोरडगाव मंडळाचा समावेश करावा या मागणीसाठी नाईक चौकात आपल्या समर्थकांसह उपोषण सुरु केले असून या आंदोलनाला आज घुले यांनी पाठिंबा दिला त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी गोकुळ दौड,शेवगाव बाजार समिती अध्यक्ष एकनाथ कसाळ,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास नेमाने,स्वप्नील देशमुख,अनिल बंड,डॉ.भास्कर खेडकर,नंदू मुंडे,हनुमान पातकळ,नानासाहेब मडके,किसन आव्हाड,सोमनाथ बोरुडे,रामकिसन शिरसाठ हे उपस्थित होते. पुढे बोलताना घुले म्हणाले की,गोकुळ भाऊ यांच्या मागणीनंतर प्रशासनाने दुष्काळ सदृश अहवाल दिला तर परंतु त्यातही ज्या मंडळाने आजपर्यंत लोकप्रतिनिधीना भरघोस असा पाठींबा दिला ते 

कोरडगाव मंडळ वगळल हे निषेधार्थ आहे.ज्या सर्वसामान्यांनी तुम्हाला तारल त्याला तुम्ही विसरून गेले.आजपर्यंत अशी दुर्देवी परिस्थिती शेवगाव- पाथर्डी तालुक्यावर आली नसेल.पाथर्डीकडेच लक्ष नाही ते शेवगावकडे काय लक्ष देणार.आज पक्ष बाजूला ठेवत शेवगाव-पाथर्डीला दुष्काळ जाहीर व्हावा या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आपण एकत्र आला आहात हे कौतुकास्पद आहे.पाथर्डी-शेवगाव तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थितीचा अहवाल दिला आहे.परंतु शेवगाव पाथर्डी मध्ये दुष्काळ सदृश नाही तर गंभीर दुष्काळ जाहीर करण्याची आमची मागणी असून ती मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही..सभापती सभापती एकत्र आले त्यात वेगळे वाटण्याचं काही नाही जर कोणाला काही वेगळं वाटतं असेल तर ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्यांच्या पद्धतीने अर्थ घ्यावा शेवटी आम्ही शेतकरी,कष्टकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी एकत्र आलो आहोत या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये आहेत मात्र अजून एकही अधिकारी आंदोलनस्थळी आला नाही व लोकप्रतिनिधी सुद्धा फिरकले नाही. येणाऱ्या काळात जिथे जिथे सर्वसामान्यांना अडचण येईल त्यांच्या पाठीमागे घुले कुटूंब उभे राहील.येथे पक्षाचा विषय नाही आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून निवडून आलो आहोत.प्रस्थापित लोक जर तूमच्याकडे लक्ष देत नसतील तर गोकुळ भाऊंनी काळजी करू नये.जर या उपोषणातून काही साध्य झालं नाही.तर शेवगाव पाथर्डीतील आपण सगळे जण मंत्रालयाच्या गेटसमोर जाऊन बसू.या आंदोलनात शेवगाव तालुक्यातील सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होईल. तर या वेळी लोकप्रतिनिधी यांच्या निषेधाच्या घोषणा सुद्धा आंदोलकांनी दिल्या.

COMMENTS