चंद्रपूर प्रतिनिधी - चंद्रपूर जिल्हा संपन्न वन्यजीव आणि जैवविविधतेने नटलेला आहे. या जिल्ह्यात असणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर

चंद्रपूर प्रतिनिधी – चंद्रपूर जिल्हा संपन्न वन्यजीव आणि जैवविविधतेने नटलेला आहे. या जिल्ह्यात असणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर पर्यटन 1 ऑक्टोबरपासून खुले झाले आहे. मात्र जिल्ह्यातील बफर भागामध्येही वाघांचे मोठे वास्तव्य आहे. याच बफर भागात चिमूर तालुक्यातील निमढेला बफरक्षेत्रात रामदेगी येथे असलेल्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिराता पूजा सुरू असताना छतावर वाघाचा धुडगूस सुरू होता. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांचा राबता असतो. हे मंदिर नेहमीच भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेले असते. या मंदिराच्या आसपासच्या भागात मटका नावाच्या एका छोट्या वाघाच्या बछड्याचा वावर असतो. आज तर कमालच झाली, मंदिरामध्ये भाविक आरती करत होते आणि छतावर वाघोबांचा धुडगूस सुरू होता. बंडा अरविंद नावाच्या वन्यजीवप्रेमीने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. याचा व्हिडीओ व्हारयल झाला आहे.
COMMENTS