Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहेराकडून घर बांधण्यासाठी 15 लाख रुपये मागितल्याने उपाशी ठेवून, बाळासहित घराबाहेर हाकलले

केज । प्रतिनिधी दहिफळ वडमाऊली येथील शितल चा विवाह तीन वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील वडजी येथील अजय रामेश्वर जाधवर यांच्यासोबत हिंदू रिती-रिवाजानुसा

अहिल्यानगरमध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघड; दोन संशयित ताब्यात
किनवटमधील गुन्हेगारी टोळीवर मोठी कारवाई; दोन सराईत गुन्हेगार नांदेड जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी हद्दपार
पत्नी घटस्फोट देत नव्हती म्हणून सासरवाडीतील चौघांना पेटवले .

केज । प्रतिनिधी
दहिफळ वडमाऊली येथील शितल चा विवाह तीन वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील वडजी येथील अजय रामेश्वर जाधवर यांच्यासोबत हिंदू रिती-रिवाजानुसार झाला होता. लग्नानंतर सुरुवातीच्या वर्षात शितलची सासरची मंडळी नीट सांभाळत होती.
परंतु, काही काळानंतर पती अजय जाधवर याला ऑनलाइन गेमची सवय लागल्याने त्याच्यावर खाजगी सावकारांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज झाले. कर्जाचा ताण कमी करण्यासाठी सासरच्यांनी शितलवर सतत तगादा लावला. या ताणामुळे दिड महिन्यांपूर्वी शितलच्या आई-वडिलांनी त्यांची जमीन विकून तीन लाख रुपये दिले. तरीही पती अजय जाधवर शितलला कॉल करून खाजगी सावकारांना कॉलवर बोलवण्यास जबरदस्ती करत होता. शितल बोलली नाही तर बाळासह तिला मारून टाकण्याची धमकी देत होता. शितलवर शारीरिक आणि मानसिक छळ करत, उपाशी ठेवून, शिवीगाळ करून, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी शितलला बाळासह घराबाहेर हाकलण्यात आले. याबाबत शितलच्या फिर्यादीवरून अजय रामेश्वर जाधवर (पती), रामेश्वर अर्जुन जाधवर (सासरा) आणि रमा रामेश्वर जाधवर (सासू) यांच्या विरोधात केज पोलिस ठाण्यात शारीरिक व मानसिक छळ, मारहाण आणि बाळासह घराबाहेर हाकलण्याचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जमादार पल्लवी तरकसे हा प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS