Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाण्याची टाकी साफ करताना तीन कामगारांचा मृत्यू

ठाणे ः अंबरनाथ जवळील जांभूळ गावात विजेचा धक्का लागून तीन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली असून या घ

खरीप हंगाम शेतकर्‍यांच्या हिताचा होण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन-पालकमंत्री
बंगला फोडून चोरट्याने दिड लाखाचा मुद्देमाल केला लंपास l पहा LokNews24
18 वी आंतर जिल्हा मैदानी अजिंक्यपद निवड स्पर्धा उत्साहात

ठाणे ः अंबरनाथ जवळील जांभूळ गावात विजेचा धक्का लागून तीन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंबरनाथमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अंबरनाथ जवळील जांभूळ गावात विजेचा धक्का लागून तीन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला.
पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबरनाथमध्ये जवळ गावात पाण्याच्या टाकीचे काम सुरू होते. यावेळी टाकीतून पाणी उपसण्याचे काम सुरू असताना पाणी उपसा करणार्‍या मोटारमधून विद्युत प्रवाह पाण्यात उतरला. पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे कामगारांना विजेचा धक्का बसला ज्यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुलशन मंडल, राजन मंडल आणि शालिग्राम कुमार मंडल अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS