Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपुरात तीन कामगारांचा होरपळून मृत्यू

हिंगणा एमआयडीसीतील घटना

नागपूर/प्रतिनिधी ः नागपुरातील हिंगणा एमआयडीसीतील सोनेगाव निपाणी येथील कटारिया अ‍ॅग्रो कंपनीला लागलेल्या एका कंपनीला लागलेल्या आगीत 3 कामगारांचा ह

तरुणांनी राजकारणात येण्याची हिच खरी वेळ – विनोदसिंग परदेशी
छोटे-मोठे साहेब हजर…पण कार्यालयाचे काम मात्र पूर्ण बंद
मुळा 40 टक्के तर भंडारदरा निम्मे भरले ; पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम

नागपूर/प्रतिनिधी ः नागपुरातील हिंगणा एमआयडीसीतील सोनेगाव निपाणी येथील कटारिया अ‍ॅग्रो कंपनीला लागलेल्या एका कंपनीला लागलेल्या आगीत 3 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आणखी तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले, अथक प्रयत्नानंतर सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आग लागली तेव्हा सुमारे 15 कर्मचारी आत काम करत होते. प्राथमिक तपासात इलेक्ट्रिक केबलचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कटारिया अ‍ॅग्रो कंपनीत जनावरांसाठी पेंढा बनवला जातो. यासोबतच येथे बायोगॅसची निर्मितीही केली जाते. कंपनी दोन शिफ्टमध्ये काम करते. प्रत्येक शिफ्टमध्ये 15-15 लोक काम करतात. सोमवारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू झाले. दरम्यान, सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. पेंढा असल्याने आग काही वेळातच संपूर्ण परिसरात पसरली. त्यामुळे संपूर्ण कारखाना धुराने भरला होता. त्याचवेळी आकाशात धुराचा फुगा दिसू लागला. आग इतकी भीषण आहे की, दूरपर्यंत धुराचे लोट दिसून आले. अग्निशमन दलाच्या सुमारे 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे. यानंतर आता आग नियंत्रणात आली आहे.तर कंपनीमध्ये 20-30 कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीमुळे आसपासच्या परिसरामध्ये धुराचे ढग पसरले आहेत. दरम्यान या आगीमध्ये कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तर नागपूरच्या जिल्हाधिकार्‍यांना तातडीने याबाबत समन्वय साधण्यास सांगितले आहे. या घटनेतील जखमींना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

COMMENTS