Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलढाण्यात भरधाव कारच्या धडकेत तीन महिला ठार

बुलडाणा प्रतिनिधी - राज्यातून अपघाताच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. रस्ते अपघातामध्ये अनेकदा लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळेच र

गुजरातमध्ये अपघातात 9 जणांचा मृत्यू
समृद्धीवरील अपघातात चौघांचा मृत्यू
अमरावतीमध्ये भीषण अपघातात 6 ठार !

बुलडाणा प्रतिनिधी – राज्यातून अपघाताच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. रस्ते अपघातामध्ये अनेकदा लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळेच रस्त्यावर नेहमी वाहनं हळू चालवण्याचा आणि सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. बुलढाणा जिल्ह्यातून अशाच एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदजवळ एका कारने पायी चालणाऱ्या 3 जणांना उडवलं आहे. यात तिन्ही जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या महिला शेतातून काम करून घराकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. पोलिसांनी घटनास्थळ गाठत कारसह चालकाला ताब्यात घेतलं आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेतले गेले आहेत सूत गिरणीजवळील टर्निंगवर हा अपघात घडला. यात भरधाव कारची धडक इतकी जबर होती, की तिघींचाही जागीच मृत्यू झाला. यात मायलेकीसह एका वृद्ध महिलेनं आपला जीव गमावला आहे. जळगाव जामोद शहरात हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या महिला शेतात कामासाठी गेल्या होत्या. यानंतर शेतातील कामं आटोपल्यावर घरी जाताना त्या रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. इतक्यात एक भरधाव कारने त्यांना चिरडलं.

COMMENTS