Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाभळगाव खालसा येथे तीन सिंगल फेज डीपी मंजूर

कर्जत :  बाभळगाव खालसा गावात शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून डीपीची मागणीची दखल घेत माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव खेडकर यांच्या माध्यमातून तीन ठि

न्यायालयाला अतिरिक्त मजला; न्यायाधीशांसाठी नवीन कक्ष
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात यशराज खुरंगेची निवड
कुकडी कालव्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

कर्जत :  बाभळगाव खालसा गावात शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून डीपीची मागणीची दखल घेत माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव खेडकर यांच्या माध्यमातून तीन ठिकाणी सिंगल फेज डीपी मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी उदमले वस्ती व झोडगे वस्ती येथे दोन सिंगल फेज डीपींचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा विजेचा प्रश्न सुटला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

या डीपींसाठी ग्रामस्थांनी यापूर्वी अशोकराव खेडकर यांच्याकडे मागणी केली होती. त्या मागणीची तत्काळ पूर्तता करत त्यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून तीनही डीपी मंजूर करून घेतल्या. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वीजपुरवठा अधिक सुरळीत होणार असून पिकांच्या सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.

लोकार्पण प्रसंगी बोलताना अशोकराव खेडकर म्हणाले की, “विधानपरिषदेचे सभापती प्रा .राम शिंदे  यांच्या सहकार्यामुळे केवळ बाभळगाव खालसा नव्हे तर संपूर्ण चापडगाव गटामध्ये अनेक ठिकाणी सिंगल फेज डीपी मंजूर करून घेणे शक्य झाले. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे.”

यावेळी सरपंच सुभाष पाबळे, डॉ. दिगंबर पुराणे, माजी सरपंच पंडित पुराणे, भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश आण्णा तोरडमल, आप्पासाहेब कांबळे, सुधीर झोडगे, केशव पाबळे, पोपट धनवडे, प्रा.भास्कर कदम, ज्ञानदेव तोरडमल, बाळासाहेब गुंड, बापूराव काळे, गणेश शिकारे, सचिन खेडकर, बाबासाहेब कदम, मोतीलाल गुंड, बापू शिंदे, भाऊ जवणे, बंडू पाबळे, आकाश तोरडमल, सतीश पाबळे, सतीश तोरडमल, बाळासाहेब कापरे, पंकज पुराणे, सचिन कदम, रावसाहेब शिंदे, संतोष धनवडे, संतोष पुराणे, बापू काळे,प्रशांत पुराणे, किशोर पाबळे,आजिनाथ कापरे, वैभव गुंड, कुंदन पाबळे, शहाजी झोडगे, अर्जुन तोरडमल, संदीप गुंड,अशोक पुराणे, निलेश साळवे, करण कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS