अहिल्यानगर- केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे दि. १ जुलै २०२४ पासून ३ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्याची मागणी
अहिल्यानगर- केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे दि. १ जुलै २०२४ पासून ३ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांना शिक्षक भारती संघटनेच्या वतीने निवेदन दिले असल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारती संघटनेचे राज्यसचिव सुनील गाडगे यांनी दिली.
केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दि. १ जुलै २०२४ पासून ३ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२४ पासून ३ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करणे निकडीचे आहे. त्यामुळे दि. १ जुलै २०२४ पासून ३ टक्के वाढीव महागाई भत्ता थकबाकीसह देण्याचा निर्णय राज्य शासनाने घोषित करावा, अशी राज्यातील शिक्षक, कर्मचाऱ्यांची भावना असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे १ जुलै २०२४ पासून ३ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करावा, यासाठी शासन आदेश त्वरित निर्गमित करून थकबाकीसह वाढीव महागाई भत्ता जानेवारी २०२५ च्या वेतनासोबत वितरित करण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ आशा मगर, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, कैलास जाधव, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, , सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, सोमनाथ बोंतले, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर, विनाअनुदानित च्या राज्यअध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींनी मागणी केली आहे.
COMMENTS