Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापुरात कारने चिरडले, तिघांचा मृत्यू

कोल्हापूर ः कोल्हापूरमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरूवारी पहाटे काळजाला हादरवणारी दुर्घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या एका कारने तिघांना चिरडल

अपघातात एकाच कुटुंबांतील 6 जणांचा मृत्यू
सिन्नर -शिर्डी राज्य मार्गावर खाजगी आराम बस आणि ट्रकचा भीषण अपघात
कर्जत तालुक्यात अपघातानंतर दुचाकी नेली फरपटत

कोल्हापूर ः कोल्हापूरमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरूवारी पहाटे काळजाला हादरवणारी दुर्घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या एका कारने तिघांना चिरडल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
अपघाताची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरात हा अपघात झाला. थंडीपासून बचावासाठी तिघेजण रस्त्याच्या कडेला शेकोटी पेटवून उभे असताना अचानक वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली. शाहूपुरी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठवले असून मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या भीषण अपघातामुळे तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS