फलटण / प्रतिनिधी : कंपाला युगांडा येथून एकाच कुटूंबातील चार व्यक्ती दि. 9 डिसेंबर रोजी लक्ष्मीनगर फलटण येथे आल्या होत्या. या व्यक्ती आल्याची माहि
फलटण / प्रतिनिधी : कंपाला युगांडा येथून एकाच कुटूंबातील चार व्यक्ती दि. 9 डिसेंबर रोजी लक्ष्मीनगर फलटण येथे आल्या होत्या. या व्यक्ती आल्याची माहिती आरोग्य विभागास मिळाल्यानंतर आरोग्य विभागामार्फत त्यांची तपासणी व आरटीपीसीआर टेस्ट दि 13 रोजी करणेत आली. या तपासणीमध्ये तिघेजण कोरोना बाधित असल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते. एकाची टेस्ट खपलेपलर्श्रीीर्ळींश आली. त्यानंतर आरटीपीसीआर लॅब मार्फत या रुग्णांचे नमूने जिनोम सिक्वेनसिंगसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजी पुणे येथे पाठविणेत आले.
या तपासणीचा अहवाल 18 डिसेंबर रोजी प्राप्त झाला. त्यामधून तिघेजण कोरोनाच्या ओमिक्रोन व्हायरंटची बाधा झाली असल्याचे अहवालात निदर्शनास आले आहे. तसेच चौथा रुग्ण कोरोना बाधित सापडला. या कुटूंबाचे 13 डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे विशेष कक्षामध्ये विलगीकरण करणेत आले आहे. या चारही व्यक्तींची प्रकृती चांगली आहे. निकट सहवासितांचे अहवाल कोव्हीड 19 साठी निगेटिव्ह आले आहेत.
जनतेने ओमिक्रोनची भिती बाळगू नये. तथापि कोव्हीड 19 संबंधित सर्व नियमांचे व सूचनांचे काटेकोर पणे पालन करावे. सर्वांनी कोव्हीड 19 चे प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. तसेच परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांनी होम क्वारंटाईन होऊन कोव्हीड 19 ची तपासणी करुन घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे सूचित केले आहे. नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS