Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजेचा धक्का लागल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दापोडी येथील घटना

पुणे ः पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दापोडी येथे एकाच कुटुंबातील तिघांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी घडली. मृतांमध

लोखंडी सळीने पतंग काढण्याच्या प्रयत्नात 13 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू 
गणेश विसर्जन करताना 11 जणांना बसला विजेचा शॉक
इलेक्ट्रिक पोलवर काम करताना शॉक लागून एकाचा  मृत्यू  एक जखमी 

पुणे ः पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दापोडी येथे एकाच कुटुंबातील तिघांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी घडली. मृतांमध्ये आई-वडिलांसह मुलाचा समावेश आहे. अंघोळ केल्यानंतर टॉवेल वाळात घालण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला विजेचा शॉक लागला. त्यामुळे त्यास वाचविण्यासाठी त्यांची पत्नी धावपळीत जाऊन तिने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्याचे नादात तिला देखील विजेचा शॉक लागला. यादरम्यान, आईवडील दोघांना विजेचा शॉक बसत असल्याचे पाहून त्यांच्या बचावासाठी गेलेल्या मुलास देखील वीजेचा शॉक लागून तिघांचा एकचवेळी दुर्देवीरित्या मृत्यु झाल्याची घटना दौंड तालुक्यातील दापोडी या ठिकाणी घडली आहे.
सुरेंद्र देविदास भालेकर (वय-44), पत्नी अदिका सुरेंद्र भालेकर (38) व प्रसाद सुरेंद्र भालेकर (17) अशी या घटनेत मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहे. भालेकर कुटुंब मुळचे सोलापूर येथील रहिवासी असून ते कामाच्या निमित्ताने दौंड तालुक्यात दापोडी येथे अडसूळ नावाच्या व्यक्तीचे खोलीत भाडयाने राहत होते. संबंधित त्यांची राहती खोली ही पत्र्याची असून त्यांच्या खोली शेजारीच विजेचा खांब आहे. सुरेंद्र भालेकर हे सोमवारी सकाळी आंघोळ करुन ओला झालेला टॉवेल वाळत टाकण्यासाठी घराजवळील तारेपाशी गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरात वीज पुरवठा केलेली एक वायर पत्र्यावर टाकलेली होती. वार्‍याने सदर वायर हलून त्याचेवरील आवारण निघून गेल्याने वायर मधील वीजप्रवाह हा जवळच्या तारेत देखील उतरला होता. याच तारेवर सुरेंद्र भालेकर टॉवेल वाळत टाकण्यासाठी गेले असताना त्यांना जोरात वीजेचा धक्का बसला. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे त्यांची पत्नी अदिका त्यांना वाचविण्यासाठी धावत आली व तिला देखील वीजेचा धक्का बसला. आईवडिलांना याचवेळी ओढण्याचा प्रयत्न करत असताना मुलगा प्रसाद यास देखील विजेचा धक्का लागून त्याचा देखील दुर्देवी मृत्यु झाला.

COMMENTS