जळगाव जिल्ह्यातील अपघातात तिघे ठार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यातील अपघातात तिघे ठार

जळगाव : जामनेर तालुक्यातील टाकळी गावाजवळ नागदेवता मंदिर भागात भरधाव मालमोटारीने कट मारल्याने कार नाल्यात उलटली. त्यात कारमधील तीन जण जागीच ठार झाले,

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
भररस्त्यात अचानक पेटली कार अन्….
लोकशाही सशक्त करावयाची असेल, तर…….!

जळगाव : जामनेर तालुक्यातील टाकळी गावाजवळ नागदेवता मंदिर भागात भरधाव मालमोटारीने कट मारल्याने कार नाल्यात उलटली. त्यात कारमधील तीन जण जागीच ठार झाले, तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. त्यात सहा महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. जळगाव जिल्ह्यातील अपघातांचे सत्र सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी जामनेर तालुक्यातील गारखेडा तेथे मालमोटार व पॅजो रिक्षाच्या धडकेत चार ठार झाल्याची घटना ताजी असतानाच, गुरुवारी पुन्हा मालमोटार व कारचा अपघात झाला. यातही तीन जागीच ठार झाले आहेत. भुसावळ येथील नागरिक पाचोर्याच्या दिशेने विवाह सोहळ्यासाठी कारने (एमएच 18, डब्ल्यू 2412) निघाले होते. पाचोरा रस्त्याकडे जाणार्या टाकळी गावाजवळ भरधाव जाणार्या मालमोटारीने कारला कट मारल्याने चालकाचा ताबा सुटला. यामुळे कार नाल्यात कोसळून तीन जागीच ठार झाले, तर दोन जण अत्यवस्थ असून, सहा महिन्यांचे बाळ अपघातातून वाचले आहे. या अपघातात पंकज गोविंदा सैंदाणे (वय 24, राहणार तुकारामनगर), सुजाता प्रवीण हिवरे (वय 30, राहणार त्रिमूर्तीनगर, भुसावळ) व प्रतिभा जगदीश सैंदाणे यांचा मृत्यू झालाय. हर्षा पंकज सैंदाणे, नेहा राजेश अग्रवाल, लहान बाळ स्पंदन पंकज सैंदाणे हे जखमी झाले आहेत. स्पंदन याचे वडील पंकज यांचा अपघातात मृत्यू झाला असून, तो पित्रृप्रेमाला आता पोरका झाला आहे. बाळाची आई हर्षा सैंदाणे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS