Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वरळी सी लिंकवरील अपघातात तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबई वरळी सी लिंक टोल नाक्यावर गुरुवारी उशीरा रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. दोन भरधाव कारची धडक होऊन तीन जण ठार तर सहा जण गंभीर जख

दान- धर्म आणि राजे
संगमनेर शहराला पावसाने झोडपले
पुणे-सातारा मार्गावर खंबाटकी घाटात मालट्रकसह कार जळाली

मुंबई : मुंबई वरळी सी लिंक टोल नाक्यावर गुरुवारी उशीरा रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. दोन भरधाव कारची धडक होऊन तीन जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. दरम्यान, अपघातामुळे या मार्गवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या सी लिंक टोल नाक्यावर हा भीषण अपघात झाला. टोल नाक्यावर उभे असलेल्या दोन वाहनांना मागून भरधाव वेगात आलेल्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमी नागरिकांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. वरळीहून वांद्र्याच्या दिशेने भरधाव वेगात एक इनोव्हा कार वांद्र्याला जात होती. यावेळी गाडीवर नियंत्रण सुटल्याने टोल प्लाझाजवळ उभ्या असलेल्या वाहनांना ही कार धडकली. यावेळी पाठीमागून येणारी आणखी 6 वाहने एकमेकांवर आदळली. यामुळे 10 जण जखमी झाले तर यातील तिघे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. आरोपी चालकाला ताब्यात घेऊन इनोव्हा जप्त करण्यात आली आहे.

COMMENTS