Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धीवरील अपघातात तिघांचा मृत्यू

नागपूर ः समृद्धी महामार्गावर सुरू असलेल्या अपघातांची संख्या अजूनही कमी होवू शकली नसून, सोमवारी काही तासांच्या अंतराने झालेल्या दोन अपघातांमध्ये त

कल्याण स्थानकात एक्स्प्रेस पकडताना प्रवाशांचा अपघात, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
दुर्देवी ! चिमुकल्याला वाचवताना आईचा गेला जीव.
दिल्ली-मुंबई महामार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू

नागपूर ः समृद्धी महामार्गावर सुरू असलेल्या अपघातांची संख्या अजूनही कमी होवू शकली नसून, सोमवारी काही तासांच्या अंतराने झालेल्या दोन अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, 9 जण जखमी झाले आहेत. यातील पहिल्या अपघातात चालकाला डुलकी लागल्याने भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रित होऊन साईड बेरिअरला धडकली. या घटनेत तिघे ठार झाले, तर 4 जण गंभीर जखमी झाले. दुसरी अपघाताची घटना देखील चालकाला डुलकी लागल्यानेच घडली. पुण्याहून नागपूरच्या दिशेने निघालेली कार ट्रकला पाठीमागून धडकली. या घटनेत 5 जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. दोन्ही अपघातातील जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. सजित शेख (वय 32) बुर खान (वय 3) नाईमुनिया (वय 4) जयेश मोहंमद (वय 5) आणि फैयाज खान, अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही कार नागपूरच्या दिशेने जात होत्या. यातील पहिल्या कारचा नागपूर कॉरिडॉर वरील चॅनेज क्रमांक 317 जवळ बॅरिकेट्सला धडकली. या घटनेत तिघे जण मृत्युमुखी पडले. तर 5 गंभीर जखमी झाले. दुसर्‍या अपघातातील व्यक्ती हे पुण्याहून नागपूरच्या दिशेने जात होते. नागपूर कॅरीडोरवर चॅनेज क्रमांक  338 जवळ कार आली असता चालकाला अचानक डुलकी लागली. कारचा वेग जास्त असल्याने अनियंत्रित होऊन ती ट्रकला पाठीमागून धडकली. अपघात इतका भीषण होता, की कारचा चक्काचूर झाला.

COMMENTS