Homeताज्या बातम्यादेश

फलकनुमा ट्रेनच्या तीन डब्याना भीषण आग

तेलंगणा प्रतिनिधी - पश्चिम बंगालहून सिकंदराबादला जाणाऱ्या फलकनुमा एक्स्प्रेस ट्रेनला शुक्रवारी आग लागली. आगीनंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही

…तर, राजकीय संन्यास घेईल ः फडणवीस
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार
अल्पसंख्याक उमेदवारांना निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण देणार

तेलंगणा प्रतिनिधी – पश्चिम बंगालहून सिकंदराबादला जाणाऱ्या फलकनुमा एक्स्प्रेस ट्रेनला शुक्रवारी आग लागली. आगीनंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही वेळातच आग इतकी भीषण झाली की ट्रेनचे तीन डबे जळून खाक झाले. मात्र, या अपघातात कोणालाही जीव गमवावा लागला नाही. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले की, फलकनुमा एक्सप्रेस पश्चिम बंगालहून सिकंदराबादला निघाली होती. शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता तेलंगणातील नलगोंडाजवळील पगडीपल्ली येथे ट्रेनला आग लागली. काही वेळातच आग तीन डब्यांमध्ये पसरली. आगीत एस 4, एस 5 आणि एस 6 हे डबे जळून खाक झाले. आग लागल्यानंतर प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यात आले. आता त्यांना दुसऱ्या ट्रेनने पाठवले जात आहे ट्रेनला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वेने तपास सुरू केला आहे. या अपघातात कोणालाही जीव गमवावा लागला नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. अपघाताचे व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये रेल्वेच्या बोगी आगीच्या ज्वाळांमध्ये जळताना दिसत आहेत.

COMMENTS