Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकी

मुंबई/प्रतिनिधी ः भाजपचे आमदार आणि उद्योजक असलेले प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यानंतर लाड यांनी मुख्यमंत्र

चाचण्याही करणे अनिवार्य
मंजूर बंधारा दुर्घटनेतील मयत संतोष तांगतोडे च्या वारसांना आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते 4 लाखाचा धनादेश
संजीवनीच्या 10 अभियंत्यांची नामांकित कंपनीत निवड

मुंबई/प्रतिनिधी ः भाजपचे आमदार आणि उद्योजक असलेले प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यानंतर लाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या जीवाला धोका असून वारंवार धमकी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर एका अनोळखी व्यक्तीकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा देखील प्रसाद लाड यांनी आपल्या पत्रात केला आहे.
लाड यांनी गायकवाड नामक व्यक्ती वेगवेगळ्या मार्गाने जीवे मारण्याच्या प्रयत्नात असल्याचे पोलिसांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. कामगारांसाठी काम करत असतांना आपल्याला अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याचेही लाड यांनी म्हटले आहे. या संदर्भात आपण पोलिस आयुक्तांना पत्र दिले असल्याची माहिती लाड यांनी दिली आहे. त्यानी याची माहिती त्यांच्या सोशल मीडियावरूनही शेअर केली आहे. यामध्ये प्रसाद लाड म्हणाले की, ’कामगार क्षेत्रात काम करत असताना सातत्याने आलेल्या 2 धमक्यांची तक्रार, पोलिस आयुक्त मुंबई व पोलिस खात्याच्या इतर प्रमुख अधिकार्‍यांना केली आहे. माझी अपेक्षा आहे की, पोलिस प्रशासनाकडून याबाबत तात्काळ दखल घेतली जाईल, आणि माझ्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल सरकारकडून काळजी घेतली जाईल, असे लाड यांनी म्हटले आहे.

COMMENTS